शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसयूव्ही... रफटफ आरामदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:33 IST

गेल्या काही वर्षांमध्ये एसयूव्ही (SUV) हा वाहनातील प्रकार चांगलाच वाढीला लागला आहे. वाढीला लागला आहे असे म्हणण्याचे कारण की पूर्वीपेक्षा जास्त प्रकारच्या व कंपन्यांच्या एसयूव्हींचे पर्याय ग्राहकांसमोर आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये एसयूव्ही (SUV) हा वाहनातील प्रकार चांगलाच वाढीला लागला आहे. वाढीला लागला आहे असे म्हणण्याचे कारण की पूर्वीपेक्षा जास्त प्रकारच्या व कंपन्यांच्या एसयूव्हींचे पर्याय ग्राहकांसमोर आहेत. साधारणपणे एसयूव्ही ( SPORT UTILITY VEHICLE) ही स्टेशनवॅगन या प्रकारातील कार असून जीपसारख्या दणकट वाहनाकडे झुकणारी एसयूव्ही आज मात्र कारइतकाचा सुखदायी प्रवास व ड्राइव्ह कम्फर्ट देणारी आहे. काही कंपन्यांच्या एसयूव्हीनी तर भारतातील राजकीय नेते व कार्यकर्त्यांच्या गाड्या म्हमून छाप बसवून घेतली आहे. किबंहुना त्यामुळे काही ग्राहक त्या एसयूव्हीपेक्षा अधिक वेगळ्या लूकच्या एसयूव्ही पाहायला लागले व त्यातच एसयूव्ही लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त असल्याने टुरिस्टसाठीही त्यांचा वापर होऊ लागला. अशामुळे त्या एसयूव्हीमध्ये अधिकाधिक संशोधन होऊन त्यातही उच्चश्रेणीच्या एसयूव्ही काही कंपन्यांनी बाजारात आणल्या. उच्चपदस्थ अधिकारी उच्चभ्रू वर्गातील लोकांनाही सेदानपेक्षा एसयूव्ही अधिक आवडू लागल्या. सेदानकडून अनेकजण एसयूव्हीकडे वळू लागले.लांब, रूंद, दणकट, डिझेल इंधनामुळे शक्तीशाली व लांबच्या प्रवासासाठी आवश्यक जागेमुळे जास्त प्रवासी नेणारी कौटुंबिक वापरासाठीही उपयुक्त वाटू लागली. किंबहुना सेदानच्या वापराकडूनही एसयूव्हीसाठी ग्राहक वळू लागले आहेत. मात्र काही झाले तरी एसयूव्ही ही लांबच्या प्रवासासाठी अधिक सुविधाजनक, आरामदायी करण्यात आलेली आहे हे नाकारता येणार नाही. ग्राहकांच्या मागमीनुसार एसयूव्ही अधिकाधिक विकसित केल्या गेल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्या टू व्हील ड्राइव्हवरून फोर व्हील ड्राइव्ह पद्धतीमधीलही तयार करून विविध प्रकारच्या रस्त्यांवरही उपयुक्त करण्यात आल्या आहेत. स्टेशनवॅगनला दिलेले हे एसयूव्हीचे स्वरूप भारतामध्ये आता चांगलेच रूजू लागले आहे. प्रामुख्याने डिझेल इंधनावर चालणाऱ्या एसयूव्हीमुळे पेट्रोलपेक्षा कमी किंमतीचे व शक्तिशाली असे इंधन मोटारीच्या ताकदीला साजेसे व समर्पक वाटते. आतमधील आरामदायी आसन रचना, तीन व दोन रांगाच्या आसनव्यवस्थेमध्ये सामानालाही जागा चांगली मिळते. तीन रांगाच्या आसनव्यवस्थेत काही चांगल्या आरेखनाद्वारे आसनाची तिसरी म्हणजे सवार्त मागची आसनरांग मोल्डेबल केलेली दिसते. तसेच काहींमध्ये आसनांच्या पाठीचा भागही मागे करता येऊन एअरलाइन कम्फर्ट देण्यात येतो, त्यामुळे एक- दोन व्यक्ती छानपैकी झोपूही शकतात. अंतर्गत सुविधांवर दिलेला भर, प्रभावी वातानुकूलित यंत्रणा, जास्त ताकद, डिझेलसारखे किफायती इंधन यामुळे एसयूव्ही लोकप्रिय झाली आहे. एसयूव्हीचा लूकही इतका स्वीकारला गेला आहे की, काही कंपन्यांनी भारतामध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्ही या प्रकारालाही जन्माला घातले आहे. एसयूव्हीची ही उपयुक्तता व पॉश लूक यामुळे शहरी वापरामध्येही शोफर ड्रिव्हन कार वापरकर्त्यांनीही एसयूव्ही स्वीकारल्याचे चित्र आहे. हेच एसयूव्हीचे यश म्हणावे लागेल.