शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालनासाठी हवे संयमी कौशल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 13:50 IST

ड्रायव्हिंग येणे म्हणजे केवळ गाडीची तांत्रिकता ज्ञात असणे इतके मर्यादित नाही त्या कौशल्याबरोबर शांतवृत्ती, सहनशीलता व संयम हवा. तरच ते खरे ड्रायव्हिंग स्कील ठरेल.

वानचालकांची कमतरता हा भारतातील गंभीर विषय आहे. त्याचप्रमाणे वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहन चालकांची कमतरता हा देखील तितकाच गंभीर विषय आहे. पण याबाबत केवळ सरकारने नव्हे तर ज्याला ड्रायव्हिंग येते व ज्यांना ड्रायव्हिंग करायचे आहे,  त्या प्रत्येकानेच पुढाकार घ्यायला हवा. वाहतुकीचे नियम फारसे लक्षात न राहाण्या इतके कठीण नाहीत. परंतु जरा कुठे पुढे असलेली मोटार थांबली की मागच्या चालकाची चुळबूळ सुरू होते. काही वेळातच तो आपली कार असो की मोटारसायकल, ट्रक, टेंपो असो की मिनीबस वा बस, ती पुढे काढण्यासाठी आटापिटा सुरू करतो. मुंबई - गोवा या सारख्यया दुहेरी व विभाजक नसलेल्या महामार्गावर तर यामुळे अशाच प्रकारच्या वाहनचालकांच्या आट्यापिट्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. परंतु या साऱ्या प्रकाराबद्दल अनेकदा आपण दुसऱ्याला दोष देतो. चूकही आपणच करतो व खापर रस्त्यामध्ये वाढलेली वाहनांची संख्या, खराब रस्ते, वाहतूक पोलीस विभागाचे दुर्लक्ष, मार्गावर असलेल्या गावांमध्ये लोक फार बेशिस्त आहेत, आठवडी बाजारही कसा वाहतूक कोंडीचे कारण असतो व अखेरीस सरकारचा दोष... अशा साऱ्या वर्तनातून आपण खरेच काय साधत असतो, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. या कारणांमध्ये आपण प्रत्येक कारणीभूत असतो. प्रवासाच्या वेळेमध्ये वाया जाणाऱ्या काळाबद्दल मानसिक त्रास करून घेताना संयम बाळगायलाही शिकायला हवे. त्रागा करून घेतल्याने वाहनचालनावर परिणाम होत असतो. उतावळेपण वाढत असते. पण ते टाळणे आपल्याच हाती असते. वाहन चालवणे ही कला आहे, पण वाहन चालवताना सहनशक्ती वाढवणे, संयम ठेवणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, आपले वाहन व दुसऱ्याचा जीव सुरक्षित राहील असे वागणे ही या ड्रायव्हिंगच्या कौशल्याला आवश्यक व अपरिहार्य असणारी जोड आहे. हा 'जोडीदार' असल्याशिवाय कौशल्य कामाचे नाही, हे आवर्जून लक्षात ठेवायला हवे. वाहनांची संख्या, विशिष्ट दिवसांमध्ये असणारा रस्ते वाहतुकीतील ताण ही यानंतरच्या काळातील अविभाज्य अशी वाहतूक व्यवस्था असणार आहे. त्यामुळेच वाहन , वाहनचालनाचे शिक्षण, पुन्हा पुन्हा रिव्हॅम्प करण्याचीही गरज असणार आहे. आता गणपती उत्सवाच्या काळात कोकणात, देशावर जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार आहे तेव्हा ड्रायव्हिंगचा कस कसा लावायचा हे सर्व वाहनचालकांवर अवलंबून असणार आहे. भारतात तब्बल २२ लाख वाहनचालकांची कमतरता आहे असे विधान केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच केले आहे. पण सध्याची वाहनचालकांच्या कौशल्याची स्थिती पाहाता, चालकांच्या कौशल्याला नव्याने उजाळा देण्याचीही गरज वाटते.