शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सेदानचे प्रेस्टिज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:34 IST

सेदान कार हा एक्झिक्युटिव्ह स्तरावरच्या वा उच्चपदस्थ, उच्चभ्रू लोकांच्या दैनंदिन वापरासाठी मानाचा प्रकार वा प्रेस्टिजचा भाग वाटत होता. अद्यापही ही मानसिकता कायम आहे.

सेदान कार हा एक्झिक्युटिव्ह स्तरावरच्या वा उच्चपदस्थ, उच्चभ्रू लोकांच्या दैनंदिन वापरासाठी मानाचा प्रकार वा प्रेस्टिजचा भाग वाटत होता. अद्यापही ही मानसिकता कायम आहे. कार्यालयांमध्ये उच्चपदस्थ असणाऱ्यांना सेदानलाच (sedan) जास्त महत्त्व द्यावेसे वाटते. अलीकडच्या काळात मात्र एसयूव्ही प्रकारातील अतिउच्च श्रेणी व सुविधा असलेल्या मोटारींचा वापरही या वर्गामध्ये वाढू लागला आहे. अन्यथा आतापर्यंत या विशिष्ट वर्गातील लोकांना सेदान असणे हा प्रेस्टिजचा भाग वाटत होता. मुळात भारतात या सेदान पद्धतीच्या मोटारींचे प्रमाण अधिक होते. हॅचबॅक हा प्रकार मारुती सुझुकी कंपनीच्या मोटारी आल्यानंतर लोकांपर्यंत पोहोचू लागल्या. त्यापूर्वी प्रीमियमर, फियाट व अॅम्बेसेडर या सेदान प्रकाराच्याच मोटारी होत्या व त्यातही अॅम्बेसेडर व त्या आधीच्या शेवरले, फोर्ड व अन्य परदेशी कंपन्यांच्या शाही मोटारी या देखील सेदान प्रकारतील असल्याने सेदानला एक विशिष्ट वलय मिळाले होते.सेदान म्हणजे लांबीला जास्त असणारी, रुंदीलाही प्रशस्त असणारी व मागील बाजूस डिक्की असणारी कार. मोठे बॉनेट असणारी कार. सर्वसाधारणपणे बसण्यासाठी प्रशस्त असणाऱ्या सेदानची भुरळ त्यामुळेच पडली. सेदानमध्ये बसल्याने एक वेगळे अस्तित्त्व मिळत असावे, आसनव्यवस्था व आरामदायीपणे बसण्याची सोय असलेल्या सेदान मोटारींचे इंजिन व त्यांची ताकद ही मोठी असून लांबच्या प्रवासालाही खऱ्या अर्थाने आरामदायी असतात. पाठीला त्रास कमी होतो व पाय बऱ्यापैकी लांबही करता येतात. पालखी या मूळ संकल्पनेतून सेदानचे आरेखन तयार झाले आहे. सेदानमध्ये या रचनेमुळे खड्ड्यांच्या रस्त्यावरही आत बसणाऱ्या मागील रांगेतील आसनावरील व्यक्तीही प्रवासात न उडता बसतात. जास्त जागा व्यापणारी सेदान ही रस्ता धरून धावणारी मोटार असते. वेगही चांगला पकडू शकते, लांबच्या प्रवासात वाहन चालवताना अतिशय आरामदायीपणे वाहन चालवता येते, मुळात प्रशस्तपणा हा सेदानचा गुण असल्यानेच सेदानची लोकप्रियता टिकून आहे. पूर्णपणे प्रवासी कार म्हणावी लागेल कारण त्यात सामान वाहण्याचा भारतीय रफटफ मानसिकतेचा भाग नाही. त्यासाठी असलेल्या मोठ्या डिक्कीचा वापर केला की पुरे त्यामुळे आतमधील माणसाला सामानाची फिकीर करायची गरज नाही. बसण्याच्या आसनव्यवस्थेमधील रचनाही कोचावर रेलून बसण्यासारखी असल्याने सेदान चालवण्यापेक्षा मागे बसून शाही प्रवास घडवू शकते, हेच सेदानचे मुख्य लक्षण आहे, असे अनेकांचे मत असेल तर नवल नाही.