शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सीट कव्हरचा रंगढंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 16:28 IST

कारमध्ये कंपनीने दिलेल्या सीट्सना कव्हर नसते, पण त्याची गरज नक्कीच असते. त्यासाठी ती निवडताना साजेशी व योग्य अशीच निवडावीत. रंगाप्रमाणेच त्याचे प्रकार व दर्जा हे भागही लक्षात घ्यावेत.

कार नवीन घेतली तरी त्यामध्ये कंपनीने दिलेल्या सीट्सना आपल्या आवडीचे व कारला साजेसे सीट कव्हर टाकल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही. कार तयार करताना प्रत्येक कार उत्पादक आपल्या कारच्या सीट्सची रचना वेगळ्या रितीने करीत असतो. त्या कारला साजेशी अशी आसनरचना त्याने केलेली असते. त्या सीट्सचे फॅब्रिक कोणते असावे, त्याचा रंग कोणता असावा, त्यासाठी हेडरेस्ट इनबिल्ट असावी की हेडरेस्ट काढा घालायची असावी,पुढील सीटमध्ये व मागील सीटमध्ये काय फरक असावेत, सीटचा रंग, त्यावरचे टेक्श्चर,त्या सीट्स लेदरच्या की कापडाच्या असाव्यात, त्या सीट्सवर बसल्यानंतर कम्फर्ट मिळावा,त्या साफ करतानाही त्रास होऊ नये इत्यादी विविध बाबींची रचना कार डिझायनरने इंटेरियर डिझाईन तयार करताना काळजीपूर्वक केलेली असते. अर्थात असे असले तरी कार नवीन घेतल्यानंतर त्यावर आपल्या आवडीचे सीट्सचे कव्हर चढले जातेच. साधारण९० टक्के लोक नवी कार घेतल्यावर सीटचे कव्हर आवर्जून टाकतात. ही सीट्स कव्हर्स बाजारात कार आली की लगेच त्या मापाची तयारही मिळतात. अर्थात कारच्या खपानुसार ती जास्तीची तयार करून घेतली जात असतात. काहीवेळा ती ग्राहकाच्या मागणीनुसारही तयार करून दिली जातात. त्यात ग्राहकाच्या निवडीनुसार ती तयार केली जातात. त्यात रंगाप्रमाणेच लेदर, मायक्रो लेदर, वेलवेट, सिंथेटिक कापड, ताग आदी मटेरियलही उपलब्ध असते. थोडक्यात तुमचा चॉईस असतो.कार, एसयूव्ही इतकेच कशाला तर ट्रक, मिनी ट्रक, प्रवासी बस, टेम्पो, रिक्षा व दुचाकीसुद्धा.या नव्या सीट्स कव्हरच्या प्रेमातून, आवडीतून सुटत नाहीत. कंपनीकडून कारला दिल्या जाणाऱ्या सीट्सवर मुळात कव्हर नसते आतील स्पंज वा संबंधित मऊशार अशा फोमवर असलेले हे सीट कव्हर काढता येत नाही, ते त्या सीटला अटॅचच असते. त्यामुळे मूळ सीट खराब होऊ नये म्हणून या स्वतंत्र कव्हर्सची सोय केली गेली. कंपनीच्या एखाद्या माणसाने कव्हर्स टाकू नका असे सांगितले तरी लोक स्वतंत्रपणे काढता, घालता येणारी, धुता येणारी कव्हर्स टाकणारच, हे ठरलेले आहे. गाडीचा रंग, तुमच्या गाडीचा वापर, तुम्हाला वाटणारी स्वच्छता आदी विविध बाबतींचा विचार करून सीट्सची कव्हर्स निवडावीत. उन्हामध्ये वा उन्हाळ्यामध्ये गरम होणार नाहीत, पावसाळ्या खराब होणार नाहीत, दमटपणा पकडणार नाही, साफ करायला सहज सुलभ आहेत, अशी शक्यतो ही कव्हर्स निवडावीत. या कव्हर्सला पुढच्या आसनाच्या कव्हर्समागे कप्पाही दिला जातो. दोरीद्वारे वा इलेस्टिकद्वारे ती फीट केली जातात व ती कव्हर्स बसवणेदेखील एक कौशल्याची बाब झाली आहे. तुम्हाला ही कव्हर्स बदलताही येतात व त्याऐवजी दुसरी टाकता येतात. कारच्या मूळ सीट्सकव्हर्सचे तसे नसते. लेदरच्या सीट्स वगळता फॅब्रिकचा वापर असलेल्या सीट्स खराब झाल्या तर वाईट वाटते व ती साफकरणेही त्रासदायक असते. पण एक मात्र खरे की नवी कार नवी सीट्स कव्हर्स ही मानसिकता बदलणारी नक्की नाही.