शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्टेपनीही ठेवा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 13:16 IST

कारमध्ये दिली जाणारी स्टेपनी म्हणजे अतिरिक्त व्हील व टायर नेहमी तयारीत ठेवा टायर पंक्चर झाला तर अडीअडचणीला तीच स्टेपनी कामी येत असते.

टायर कधी पंक्चर होईल ही  वेळ कधी कधी सांगून येत नाही. पण त्यासाठी तुमच्या कारमध्ये असलेली स्टेपनी म्हणजे तुमच्या प्रवासातील तुमच्या अडचणीतून सुटल्याचा एक मोठा सुटकेचा निश्वास असतो हे कायम लक्षात ठेवा. प्रत्येक कारला सर्वसाधारणपणे एक स्टेपनी दिलेली असते. स्टेपनीमध्ये व्हील, टायर. ट्यूब वा ट्यूबलेस टायर याचा समावेश असतो. डिक्कीमध्ये ठेवलेली वा एसयूव्हीला मागच्या दाराला अटॅच केलेली ही स्टेपनी प्रवासात टायर पंक्चर झाला व जवळपास पंक्चर काढण्याची सुविधा नसेल तर लगेच पंक्चर टायरव्हील हटवून या स्टेपनीचा वापर करून पुढील प्रवास सुरू ठेवता येतो. अलीकडच्या काळात स्टेपनीकडे कोणी फारसे लक्ष देत नाही, शहरात फार त्या स्टेपनीचा वापर करण्याची आवश्यकता  भासत नाही. पण तरीही स्टेपनी गरजेची असते व तिच्यामधील हवेचे प्रेशर तपासून ती नीट चालू अवस्थेत ठेवणे गरजेचे असते. साधारणपणे कारची ही सर्व व्हील्स सारखी असतात. अलॉय व्हील मात्र चारच दिली जातात व एक स्टेपनीसाठी नेहमीचे साधे व्हील दिले जाते. वास्तविक टायर रोटेशनमध्ये या स्टेपनीचाही वापर करायला हवा पण आजच्या काळात या स्थितीमुळे ही उठाठेव कोण करीत नाही. तुमच्या कारचे स्टेपनीसहीत सर्व व्हील व टायर सारखे असतील तर टायर रोटेशनमध्ये स्टेपनीही कार्यरत ठेवा. त्यामुळे स्टेपनी नेहमी यथास्थित राहाण्यास मदत होईल. स्टेपनी अशा प्रकारे बदलली जात नसली तरी ती नेहमीच तयारीमध्ये असायला हवी. अन्यथा त्या स्टेपनीचा उल्लेख केवळ कागदोपत्रीच असेल. स्टेपनी ही जितकी गरजेची आहे तितकीच ती बदलण्यासाठी लागणारी साधनेही कारमध्ये नीट आहेत ना याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. गाडी उचलणारा जॅक, पाना आदी साधने असणे व ती चांगल्या स्थितीत असणेही कायम आवश्यकच समजा. थोडक्यात स्टेपनीला दुर्लक्षित करून तिला स्टेपमदरली वागणूक देऊ नका. अडीअडचणीत तीच कामी येणार आहे.