शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
3
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
4
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
5
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
6
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
7
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
8
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
9
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
10
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
11
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
12
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
13
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
14
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
15
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
16
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
17
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
18
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
19
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
20
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा

गरजेची दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 19:37 IST

टुव्हीलर ही आज शहरीतच नव्हे तर ग्रामीण भागात, निमशहीर भागातही अनेकांची नित्याची गरज बनली आहे, सोयीस्करपणे कधीही व कुठेही नेता येणाऱ्या या दुचाकींमुळे अनेकांचा वेळ व चांगल्या मायलेजमुळे पैसाही वाचतो. हाच प्लस पॉइंट ठरला आहे.

शहर असो वा ग्रामीण भाग दुचाकी (two wheeler) ही आज गरज बनली आहे. एकेकाळी सायकलवरून जाणारा ग्रामीण भागातील सामान्य माणूसही आज मोटारसायकल (motorbike) किंवा स्कूटर (scooter)  वरून फिरू लागला आहे. ही त्याची चैन नव्हे तर गरज आहे. ग्रामीण भागात ही स्थिती तर मग शहरात तर ती जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पुण्यात तर प्रत्येकाच्या घरात किमान २ स्कूटर्स वा मोटारसायकल असतातच कारण तेच त्यांचे दळणवळणाचे साधन झाले आहे. मुंबईमध्ये लोकलने प्रवास करण्यापेक्षा अनेकजण मोटारसायल किंवा स्कूटर्सला प्राधान्य देत आहेत. दुचाकींच्या उत्पादकांच्या खपाकडे नजर जरी टाकली तरी दुचाकीला आलेले दैनंदिन जीवनातील महत्त्व लक्षात येईल. याशिवाय जास्त ताकदीच्या मोटारसायकलींचे तरुण पिढीला मोठे आकर्षण आहे, जास्त सीसी क्षमता असणाऱ्या मोटारसायकलींचे रूपही इतके पालटले आहे, त्यात वैविध्यताही आली आहे. तरुण पिढीचे आकर्षण लक्षात घेऊन मोटारसायकलींचे उत्पादनही वाढते आहे. गर्दीच्या व वर्दळीच्या रस्त्यावरही सहजपणे मार्ग काढून पुढे जाता येते यामुळे दुचाकींच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. दुचाकीचे हे महत्त्व आता दुर्लक्षिण्यासारखे राहिले नाही. त्यात महिला वर्गांसाठी काही काळापूर्वी सुरू केलेल्या ऑटोगीयरच्या स्कूटर्स व स्कुटींनीही बाजार वधारलेला आहे. महिलां दुचाकीधारकांची संख्या पुण्याप्रमाणेच मुंबईमध्ये वाढत आहे. याशिवाय देशातील विविध शहर व ग्रामीण भागातही महिलांनी स्कूटर्स वापरण्याचे प्रमाण वाढलेले आहे. काही वर्षांपूर्वी गीयरच्या स्कूटर्सनेच सारा बाजार व्यापला होता, पण ऑटोगीयर्सच्या स्कूटरेटने त्या गीयरच्या स्कूटर्सना इतके मागे टाकले की त्यांचे उत्पादनही आता बंद केले गेले आहे. काळाप्रमाणे स्कूटर्स बदलल्या खऱ्या पण दहा - बारा वर्षांपूर्वी या स्कूटर्सपेक्षा मोटारसायकलींना मागणी जास्त होती. परंतु महिलांचाही स्कूटर्सचा वापर वाढला. केवळ तरुण महिलांच नव्हेत तर प्रौढ महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, गृहिणी, व्यावसायिक महिलांनीही स्कूटर्सना दाद दिली, त्यांना चालवायला सोप्या असणाऱ्या आजकालच्या स्कूटर्सना मायलेज कमी असूनही त्याकडे कोणी फारसे मनावर घेत असल्याचे दिसत नाही. दुचाकींच्या मायलेजचा आता साऱ्यांनाच विसर पडला आहे, किंबहुना दुचाकींची ही गरज आहे, चैन नाही, रुबाब नाही. 

मोटारसायकली १०० ते १२५ सीसी क्षमतेचे इंजिन तर ११० ते १२५ सीसीचे स्कूटर्सचे इंजिन सर्वसाधारणपणे दिसून येते. जास्तीत जास्त वापर हा सर्वसामान्यांकडून होतो. त्यावरच्या क्षमतेच्या स्कूटर्स बाजारात नसल्या तरी मोटारसायकलींच्या जबरदस्त ताकदीच्या म्हणजे १५० सीसीच नव्हेत तर अगदी ८०० सीसी ताकदीपर्यंतच्या मोटारसायकलीही तरुणाईचे आकर्षण बनल्या आहेत. त्यांची संख्या कमी नाही. मुंबई व पुण्यासारख्या शहरांमध्ये इतकी वाहतूककोंडी होत असली तरी त्यावरचा हा उपाय म्हणून दुचाकीचा उपाय आहे.