शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

ऑटो क्षेत्रातील 'या' कंपन्या देऊ शकतात उत्तम रिटर्न्स; पाहा, सध्याचा शेअरचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 07:50 IST

गुंतवणूक पुढील पाच ते दहा वर्षांसाठी असावी.

ऑटोमोबाईल क्षेत्र गेले काही वर्षे मंदीच्या फेऱ्यात होते. कोरोना काळात तर फारच अडचणींना सामोरे जावे लागलेल्या या क्षेत्राला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे.  बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन काही कंपन्यांनी सुरू केले असून, भविष्यात या वाहनांची मागणीदेखील वाढेल. या क्षेत्रातील काही कंपन्यांच्या शेअर्समधील गुंतवणूक भविष्यात चांगले रिटर्न्स देऊ शकतात. गुंतवणूक पुढील पाच ते दहा वर्षांसाठी असावी.

अशोक लेलँड - ट्रक आणि  बस बनविणारी अग्रेसर कंपनी. लाईट कमर्शियल व्हेईकल आणि संरक्षण विभागास लागणारी वाहनेही उत्पादन केली जातात.  कंपनीने एकदा स्टॉक स्प्लिट आणि दोनदा बोनस शेअर्स दिले आहेत.सध्याचा शेअरचा भाव : ₹१४०/-

बाळकृष्ण इंडस्ट्रीज :  ऑफ हायवे क्षेत्रातील वाहन श्रेणीतील वाहनांचे टायर बनविणारी कंपनी. ट्रॅक्टर, पोकलेन मशीन, क्रेन्स इत्यादी वाहनांची मोठी टायर्स ही कंपनी बनविते.  कंपनीने पाच वेळा बोनस शेअर्स आणि एकदा स्टॉक स्प्लिट केला आहे.सध्याचा शेअरचा भाव : ₹२,२३५/-

टाटा मोटर्स : ट्रक आणि कार उत्पादन क्षेत्रात अग्रेसर कंपनी. बॅटरीवर चालणारी मोटरकार सध्या बाजारपेठेत चांगली कामगिरी करीत आहे.  कंपनीने दोनदा स्टॉक स्प्लिट आणि चार वेळा बोनस शेअर्स दिले आहेत.सध्याचा शेअरचा भाव : ₹४३०/-

बॉश लिमिटेड : वाहन कंपन्यांना डिझेल सिस्टीम, गॅसोलीन सिस्टीम  आणि सुरक्षा तंत्रज्ञान पुरविणारी ही कंपनी आहे.  कंपनीने चार वेळा बोनस शेअर्स आणि एकदा स्टॉक स्प्लिट केला आहे.सध्याचा शेअरचा भाव : ₹१४,१८५/-

आयशर मोटर्स : रॉयल इन्फिल्ड मोटारसायकल, आयशर ट्रक्स, लाईट कमर्शियल व्हेइकल्स, ट्रॅक्टर व बसेस यांचे उत्पादन ही कंपनी करते.  कंपनीने एकदा स्टॉक स्प्लिट केलेला आहे.सध्याचा शेअरचा भाव : ₹२,७४२/-

भारत फोर्ज : वाहन इंजिन तसेच इंजिनिअरिंग उत्पादनांसाठी आवश्यक पार्ट्स बनविण्याचा व्यवसाय ही कंपनी करते. यात प्रामुख्याने गिअर्स, फॅन ब्लेड्स, कॉम्प्रेसर्स, टर्बाइन्स इत्यादींचा समावेश आहे. भागधारकांना चार वेळा बोनस शेअर्स आणि एकदा स्टॉक स्प्लिट केला आहे.सध्याचा शेअरचा भाव : ₹६७३/-

महिंद्रा अँड महिंद्रा : दुचाकी, कार, लाईट कमर्शियल व्हेइकल इत्यादी क्षेत्रांत कंपनीचा व्यवसाय आहे. बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी आणि कार कंपनीने बाजारात आणल्या आहेत. भागधारकांना आतापर्यंत पाच वेळा बोनस शेअर्स आणि एकदा स्टॉक स्प्लिट केले आहे.सध्याचा शेअरचा भाव : ₹९५३/-

मारुती सुझुकी :  भारतात कार घराघरांत पोचविण्याचे काम खरे तर मारुतीने केले आहे.  उत्तम आफ्टर सेल्स सेवा साखळी निर्माण केली आहे. इलेक्ट्रिक व्हेइकल या श्रेणीत मात्र या कंपनीने अद्याप पदार्पण केले नाहीये.सध्याचा शेअरचा भाव : ₹७,९४२/-

हिरो मोटरकॉर्प : मोटारसायकल श्रेणीत भारतात अव्वल कामगिरी करणारी कंपनी. उत्कृष्ट नेटवर्कद्वारे कंपनीने बाजारपेठेतील हिस्सा चांगला ठेवला आहे.  कंपनीने दोन वेळा बोनस आणि एकदा स्टॉक स्प्लिट केला आहे.सध्याचा शेअरचा भाव : ₹२,७४२/-

मदरसन सुमी : वाहनांसाठी सुटे भाग बनविणारी कंपनी. यात आरसे, कॅमेरा, गियर कटिंग टूल्स, वाहन लाईट्स आणि इलेक्ट्रिकल पार्ट्स, शॉक ॲबसॉर्बर्स इत्यादी उत्पादनात सक्रिय असून अनेक वाहन कंपन्यांना पुरवठा केला जातो. तब्बल नऊ वेळा बोनस शेअर्स आणि दोनदा स्टॉक स्प्लिट करून कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल आणि खूश ठेवले आहे.सध्याचा शेअरचा भाव : ₹१२३/-

टॅग्स :Automobileवाहनbusinessव्यवसायshare marketशेअर बाजार