शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

कार म्हणजे गॅरेज वा गोदाम नव्हे... तेव्हा मोटार ठेवा सुटसुटीत व स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 11:19 IST

कारची डिक्की ही तुमच्या प्रवासातील वैयक्तिक सामानासाठी अधिक असते, तेव्हा डिक्की म्हणजे कार दुरुस्ती व देखभालीचे अत्याधुनिक गॅरेज वा गोदाम करू नका.

ठळक मुद्देकाही लोकांच्या कार म्हणजे अप्रतिम गोदाम बनलेले असतेयामुळे प्रश्न असा पडतो की गाडीमध्ये गाडीसाठी जरुरीचे असे किती सामान असावेगाडी हे प्रवासाचे साधन आहे, त्यासाठीच ते वापरा

काही लोकांच्या कार म्हणजे अप्रतिम गोदाम बनलेले असते. डिक्कीमध्ये विनाकारण अनावश्यक सामान ठेवलेले आहे, स्वयं पूर्ण गॅरेजसारखी विविध हत्यारे, साधने त्यात ठेवलेली आहेत, पाण्याची बादली, व्हॅक्यूम क्लीनर, पाण्याचा बॅटरीवर चालणारा स्प्रे, हायड्रोलिक जॅक अशा बऱ्याच गोष्टींनी आपली कार सुसज्ज केल्याचे समाधान काही लोकांना मिळते. वास्तविक इतक्या बाबींची खरोखरच आवश्यकता नसते. वैयक्तिक वापराची कार असली तरी तुम्ही काही सर्वच साधनांचा वापर करून कार वा मोटारीची देखभाल करता असेही नाही. तसे असेल तर कारसाठी स्वतंत्र पार्किंग लॉट वा गॅरेज असेल तेथे ही साधने ठेवावीत. सतत गाडीबरोबर त्या वस्तुंचा राबता असण्याची गरज नाही. त्यामुळे कुठे लांब दौरे असले तर सामान ठेवायलाच जागा नसेल. लांब दौऱ्यावर जातानाही इतक्या साधनसामग्रीची काही गरज नसते. काही समस्या आलीच तर  गॅरेजचाच शोध घेतला जातो. यामुळे प्रश्न असा पडतो की गाडीमध्ये गाडीसाठी जरुरीचे असे किती सामान असावे, तुम्ही प्रवासात काही वाटेत गॅरेज खोलून काम करीत बसणार नाही. साधारणपणे स्टेपनी सज्ज ठेवा, पंक्चर टायर बदलण्यासाठी जॅक व संलग्न साहित्य ठेवा., हेडलॅम्पचे योग्य दोन बल्ब अतिरिक्त असले तर ते घ्या, प्रथमोपचार कीट कायम सज्ज असूद्या. त्यातील औषधे एक्सपायरी डेट उलटून गेली असतील तर ती बदला, टॉर्च, पाण्याच्या दोन मोठ्या बाटल्या पुरे झाल्या, स्क्रू ड्रायव्हर, पाने, पकड, प्लॅस्टिकच्या बाटलीचा पाण्याचा स्प्रे,  सिग्नल ट्रॅगल, दोन तीन फडकी इतक्या बाबी पुरेशा असतात. पण त्यामुळे गरजेच्यावेळी तुमचे काम करून देणाऱ्या या साधनांमळे डिक्की भरूनही जाणार नाही आणि तुमचे व तुमच्या बरोबरच्यांचे वैयक्तिक सामान ठेवायलाही जागा राहील. विनाकारण अनावश्यक अशी कार दुरुस्तीची, सफाईची साधने हौस म्हणून कारमध्ये ठेवू नका. यामुळे कार अडगळीची वाटणार नाही. साफ करायला तुम्हालाही सोपी जाईल. अनेकदा नवनव्या साधनांची माहिती मिळाल्यानंतर नवनवीन कार घेणारे विविध अतिरिक्त साधनांच्या मोहातच पडतात. तसे केल्याने खरे म्हणजे सारा दिखावूपणाच निर्माण होतो. नव्याची नवलाई नऊदिवस राहाते व ती साधने नंतर नुसती पडून राहातात. यासाठी खर्च केलेले पैसेही वायाच गेलेले असतात. गाडी हे प्रवासाचे साधन आहे, त्यासाठीच ते वापरा.