शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बाईक... तरुणाईची झिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 22:35 IST

बाईक हाताळणे वा चालवणे ही तरुणांमधील एक मोठी पॅशन आहे. तरुणांनी ही झिंग  मोटारसायकलच्या वेगाने अनुभवण्यापेक्षा सुरक्षिततेने अनुभवली तर नक्कीच अधिक स्वीकार्य ठरू शकेल.

मैत्रिणीसोबत मस्त भटकावं, मित्रांच्या घोळक्याने मस्त रपेट मारावी, वेगाच्या नशेत वारा प्यावा असे हे तरुणाईचे जीवन... अशाला साथ मोटारबाईकची असेल तर मग काय पाहायलाच नको. अगदी १०० सीसी पासून हजार बाराशे सीसीपर्यंतच्या बाईक बाजारात आल्या आहेत, येत आहेत. प्रश्न पडतो इतक्या प्रकारच्या व इतक्या कंपन्याच्या या बाईक खरोखरच तरुणांचे आकर्षण आहेत तरी का, .. अशावेळी मग लक्षात येते. आपणही कधी तरुण होतो. त्यामुळेच xxx खाओ, खुद जान जाओ.. अशी जाहिरात झाली असावी. मोटारबाईकचे तसेच आहे. अनुभवायचे सुख वा आनंद हा काही वेगळाच असतो. तरुणांमध्ये आज बाईकचे इतके वेड आहे की, त्यापायी अगदी बेकायदा रेसिंग व स्टंटबाजी करणारेही काही तरुण आहेत. बाईकची ताकद कितीही असली तरी भारतातील रस्ते, तेथील वाहतूक, तेथील नियम या साऱ्यांचा विचार करूनच बाईकशी चाळे करावेत, कारण त्यामुळे प्राणावरही बेतू शकते, केवळ तुमचेच नव्हे तर इतरांच्या प्राणाशीही आपण खेळ करीत आहोत, हे समजणे गरजेचे आहे. यासाठीच भले बाईकची झिंग कितीही असली तरी सैराट होऊ नये इतकी दक्षता नक्कीच घ्यायला पाहिजे. बाईक ही विशेष करून डायमंड वा ट्युब्यूलर चासीच्या रचनेत तयार केलेली असती. तिची रचना ही एरोडायनॅमिक पद्धतीने तयार केलेली असल्याने तसेच इंजिनची ताकद,चांगले सस्पेंशन्स, मोठे टायर्स ड्रायव्हरसाठी बसण्याची एक विशिष्ट पद्धत असलेली आसन रचना यामुळे बाईक चालवण्याची झिंग तरुणांमध्ये येणे हे देखील साहजिक आहे. किंबहुना त्या बाईकला दिल्या गेलेल्या रुपावर, ताकदीवर जरी भाळला तरी त्याच्या वेगावर नियंत्रण अतिशय दक्षतेने ठेवण्याची गरज आहे. सर्वसाधारणपणे १०० ते १५० सीसी पर्यंत ताकद असणाऱ्या बाईक्स या मायलेजला खूप चांगल्या असतात. त्यामुळे अनेकदा शहरी व शहराबाहेर लांब जाण्यासाठी बाईक्सचा वापर प्रामुख्याने केला जाऊ लागला आहे. तरुणांमध्ये नोकरदार असलेल्या तरुणांना शहरातील विविध भागांमध्ये जावे लागते, इतकेच काय शहराबाहेर असलेल्या आपल्या कार्यालयात जाण्यासाठी व रोजचे किमान जाऊन येऊन १०० ते १२० किलोमीटर इतकी सरासरी धाव असलेल्यांसाठी बाईकसारखे मायलेज देणारे चांगले साधन नाही. अर्थात त्यासाठी वेगावर नियंत्रण, योग्य गीअर शिफ्टिंग असणे गरजेचे आहे. तसेच बाईकच्या सायलेन्सरमधून होणाऱ्या फायरिंगच्या मोहातही काहीजण पडतात व त्यासाठी उगाचच एक्सरेटर मध्येच वाढवण्याचे व चमकोशिगरी करण्याचेही काम साधत असतात. अनावश्यक पद्धतीने हूल देणे, मध्येच पीक अप घेत सुसाट पळवणे, ओव्हरटेक करताना बेभानपणे वेग वाढवत ओव्हरटेक करणे असली कृत्ये करणे म्हणजे तरुणाईची झिंग नक्कीच नाही. झिंग असली पाहिजे ती आपल्या मोटारसायकलीचा वापर अधिकाधिक व सुरक्षितपणे करण्याची. आपल्या बरोबर दुसऱ्याचीही सुरक्षितता जोपासण्याची, वेगावर नियंत्रणाची, जास्तीत जास्त मायलेज काढण्यासाठी व मोटारसायकल किफायतशीर ठरवण्यासाठी सुयोग्य ड्रायव्हिंगची, चांगल्या देखभालीची. याचे कारण हीच झिंग तुमच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने मोठे करू शकते. जबाबदारीचे भान देऊ शकते. वेग काय कधीही वाढवता येतो. पिळला एक्सरेटर की सुसाट पळवता येते. सुटलेल्या बाणाप्रमाणे एकदा का एक्सरेटर दिला की वेग परत मिळवणे कठीण असते, त्या वेगाने काय घात होईल ते अनुभवण्यापेक्षा सुरक्षितता राखण्याची व तरुणाईचा खरा आनंद लुटण्याची नेमकी झिंग काय असते, ती पॅशन डिस्कव्हर करून हीरो ठरणे यातूनच खरी तरुणाईची शाईन आहे. एनफिल्ड हाताळायची असेल तर आधी फिल्ड ध्यानात घेतले तरच बाईकची झिंग अनुभवता येईल.