शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कारमधील साधनसामग्रीबाबत चोखंदळ राहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 13:36 IST

कारमधील साधनसामग्रीबाबत एकदा संबंधित बाजारामध्ये जा. कारमध्ये वेगळे काय, तसेच पर्याय काय आहेत याचा एक वेगळाच आनंद अनुभवाल. कार घेतल्यानंतर त्या कारमध्ये अन्य सीट कव्हर, स्टिअरिंग

कारमधील साधनसामग्रीबाबत एकदा संबंधित बाजारामध्ये जा. कारमध्ये वेगळे काय, तसेच पर्याय काय आहेत याचा एक वेगळाच आनंद अनुभवाल.कार घेतल्यानंतर त्या कारमध्ये अन्य सीट कव्हर, स्टिअरिंग कव्हर आदी साधनसामग्री लावण्यासाठी एक शोध सुरू होतो. अनेकदा कंपनीतूनच कारमध्ये अनेक साधने बसवण्यात आलेली असतात. अर्थात कारच्या उच्च श्रेणीमध्ये या साधनांना समाविष्ट करण्यात आलेले असते. सर्वच श्रेणींमध्ये त्या गोष्टी दिलेल्या नसल्याने मग बाजारातून स्वतंत्रपणे त्या वस्तू चॉइसप्रमाणे घेता येतात. काहीवेळा चॉइस हा जास्त महत्त्वाचा वाटतो, त्यामुळेही कंपनी वा शोरूममधून साधने घेण्याचे टाळले जाते. शोरूममध्ये फार पर्याय नसतात, हे ही खरेच आहे. पण उच्च श्रेणीतील म्हणजे एखाद्या मोटारीच्या स्तरीय आवृत्तीत, दिल्या जाणाऱ्या सर्व साधनांचीही काही गरज असतेच असे नाही. पण केवळ आपली कार हाय एंडची आहे हे दाखवण्यासाठी काहीजणांना त्याची भुरळ पडत असते. सांगायचा मुद्दा कार कोणती घेणार हे निश्चित केल्यानंतर अगदी कागद, पेन घेऊन बसा. तुम्हाला काय साधने घ्यायची आहेत ते ठरवा, यादी करा व त्यावर विचार करून बाजारात जाऊन त्या वस्तू स्वतः पाहूनही घ्या. कार घेतल्यानंतर त्यासाठी शोधाशोध व संशोधन करू नका. अनेक वस्तू तुमच्या यादीतून बाजूलाही होतील व नवीन काही वस्तू बाजारात दिसतील, त्या कारमध्ये बसवाव्याशा वाटतील. कारमधील साधनसामग्री म्हणजे अक्सेसरीज, इतक्या विविध प्रकारच्या आहेत की त्या पाहिल्याशिवाय कळणार नाही. शॉपिंगचे वेडही असे असते की काही साधने ही हवीहवीशी वाटत असतात. यी साधनसामग्रीमधील विविधता, पर्याय कंपन्यांच्या उच्चश्रेणीतील कारमध्येही नसतात. त्यामुळे  त्यामध्येही नवीन साधनांचा समावेश होत असतोच. काही साधने नंतर नकोशी वाटतात व ती काढून अन्य पर्यायही शोधले जातात. साधनसामग्रीचे हे महत्त्व अनन्यसाधारण वाटते. आवश्यकता वाटते. अगदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते साध्या ब्रशपर्यंत असणारी साधने म्हणूनच आकर्षमाचा भाग आहेत पहिल्यांदाच कार घेणाऱ्यांना नव्हे तर दुसरी वा तिसरी कार घेणाऱ्यांनाही याचे आकर्षण आहे, उपयुक्तता वाटावी अशा.या वस्तूंबाबत म्हणूनच पूर्ण यादी करा, प्रत्यक्ष बाजारात जाऊन पाहा. त्यामुळे काही प्रमाणात पैसेही वाचतील व नवे काहीही हाती लागेल.