शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या साक्षीचे राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:24 IST

तिरुपती येथे सोमवारी झालेल्या १६ व्या आंतरजिल्हा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादची प्रतिभावान खेळाडू साक्षी चव्हाण हिने देदीप्यमान कामगिरी करताना राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. साक्षी चव्हाणने १४ वर्षांखालील मुलींच्या गटातील १00 मी. धावण्याची शर्यत १२.३८ सेकंद वेळ नोंदवताना राष्ट्रीय विक्रमाची नोंद करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

ठळक मुद्देतिरुपती येथील स्पर्धा : १00 मी. मध्ये केली उल्लेखनीय कामगिरी

औरंगाबाद : तिरुपती येथे सोमवारी झालेल्या १६ व्या आंतरजिल्हा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादची प्रतिभावान खेळाडू साक्षी चव्हाण हिने देदीप्यमान कामगिरी करताना राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.साक्षी चव्हाणने १४ वर्षांखालील मुलींच्या गटातील १00 मी. धावण्याची शर्यत १२.३८ सेकंद वेळ नोंदवताना राष्ट्रीय विक्रमाची नोंद करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. साक्षी चव्हाणने याआधी केरळच्या मंजिदा नोव्हरीन हिचा १२.७३ सेकंदांचा विक्रम मोडीत काढला. मंजिदाने हा विक्रम २ डिसेंबर २0१0 मध्ये नोंदवला होता. ऐश्वर्या मोरेने १२.८३ वेळ नोंदवीत दुसरा क्रमांक मिळवला, तर ठाणे येथील सिया सावंतने १३ सेकंदांसह तिसरा क्रमांक पटकावला.साक्षी चव्हाण ही सातारा परिसरातील न्यू इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी असून, ती क्रीडा प्रबोधिनी येथे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुरेंद्र मोदी व पूनम नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ४ वर्षांपासून सराव करते. या यशाबद्दल क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, सचिव फुलचंद सलामपुरे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, पंकज भारसाखळे, अनिल निळे, सुनील वानखेडे, न्यू इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक बिना थॉमस यांनी साक्षीचे अभिनंदन केले आहे.याआधीही उमटवला विशेष ठसाचव्हाणने याच वर्षी १२ जानेवारी रोजी तिने रत्नागिरी येथील राष्ट्रीय स्पर्धेत १४ वर्षांखालील वयोगटात २00 मी. धावण्याची २५.८ सेकंदात जिंकत सुवर्णपदक मिळवले होते. त्याचप्रमाणे याच स्पर्धेत तिने १00 मी. धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकताना पदकांचा डबल धमाकाही केला होता.याच वर्षी तिने ४ बाय १00 मी. रिलेत ४६.८ सेकंदाची वेळ नोंदवत महाराष्ट्राला कास्यपदक मिळवून देण्यात निर्णायक योगदान दिले होते. तिने नागपूर येथील राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत २00 मी. मध्ये सुवर्ण व १00 मी. मध्ये रौप्यपदक जिंकले होते. तिने पुणे येथील सबज्युनिअर स्पर्धेत १00 मी. शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली होती.यावर्षी फेब्रुवारी महिन्यात साक्षीने दिल्ली येथे गेल इंडियातर्फे ‘इंडियन स्पीड स्टार’अंतर्गत अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत २00 मी. धावण्याची शर्यती २६ सेकंदांत जिंकत सुवर्ण आणि १00 मी. मध्ये रौप्यपदक पटकावले होते.