शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीचे आता गावकृती आराखडा पंधरवडा अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:10 IST

अमरावती : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत कार्यान्वित नळजोडणीव्दारे पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत २३ जुलै ते ७ ऑगस्टपर्यंत ...

अमरावती : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत कार्यान्वित नळजोडणीव्दारे पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत २३ जुलै ते ७ ऑगस्टपर्यंत गावकृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. यात गावपातळीवर नळजोडणीचा गावकृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. शुक्रवार २३ जुलैपासून जलजीवन मिशन राज्य पाणी व स्वच्छता विभागाच्यावतीने ग्रामीण पाणीपुरवठाच्या कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एंट्री ऑपरेटर तसेच जिल्हा कक्षाच्या सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार यांना झूम ॲपव्दारे गावकृती आराखडाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यात माहिती संकलन, राबविण्याच्या प्रक्रिया, कोबो टूलव्दारे माहिती अपलोड करणेबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात २३ आणि २६ व २७ जुलै या कालावधीत डेप्युटी सीईओ पाणी व स्वच्छता, डेप्युटी सीईओ पंचायत, उपअभियंता, शाखा अभियंता, भूवैज्ञानिक, मनुष्यबळ विकास सल्लागार, सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार, पाणी गुणवत्ता सल्लागार व तालुकास्तरावरील बीडीओ, विस्तार अधिकारी पंचायत, उपअभियंता, शाखा अभियंता, गट समन्वयक, समूह समन्वयक यांना झूम ॲपद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तालुकास्तरावर बीडीओ २८ ते ३१ जुलै दरम्यान प्रशिक्षण घेणार आहेत. यात गाव कृती आराखडाबाबत सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा वर्कर, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची दोन प्रतिनिधी ना झूम ॲपवर प्रशिक्षण देतील. गाव पातळीवर १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत गावकृती आराखडाच्या अनुषंगाने लागणारी माहिती कोबो टूल साधनाचा वापर करून संकलित करण्यात येणार आहे. ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान प्राप्त माहितीवरून कृती आराखडाची निर्मिती व गाव कृती आराखडा पडताळणी प्रक्रिया होऊन १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत मंजुरीकरिता कार्यक्रम पत्रिकेवर ठेवण्यात येणार आहे.

बॉक्स

गाव कृतीआराखडा पंधरवड्यात जिल्हा कक्षातील तज्ज्ञ सल्लागार तालुकास्तरावर बीडीओ, विस्तार अधिकारी पंचायत उपअभियंता, शाखा अभियंता गावपातळीवर ग्रामसेवक, जलसुरक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी सहभाग घेऊन गाव कृती आराखडा अभियान राबविण्याचे आवाहन सीईओ अविश्यांत पंडा, डेप्युटी सीईओ श्रीराम कुलकर्णी, दिलीप मानकर यांनी केले आहे.