अमरावती : पुर्वीच्या जनसंग्राम तर आता भाजपच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य अर्चना मुरुमकर यांच्या मतदार संघातील चक्क १८ लाख रुपयांची कामे परस्पर रद्द करण्याची खेळी सत्तापक्षाने चालविली आहे. परिणामी मुरुमकर यांनी मंगळवारी उशिरा रात्री सुधारित मान्यतेसाठी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचा दालनात ठिय्या दिला. अखेर प्रशासनाने दखल घेत बुधवारी नव्याने प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचे लेखी पत्र दिले. जि.प.च्या बांधकाम विभागाने सन २०१६-२०१७ मधील जिल्हा निधीअंतर्गत लोकोपयोगी कामे या लेखाशिर्षातील मंजूर कामासाठी गोरेगाव ग्रामपंचाययतींने रितसर सर्व सोपस्कार पूर्ण केलेत. मात्र ३ लाख रूपयांची कामे बांधकाम समितीने संबंधित सदस्याला विश्र्वासात न घेता रद्द केले. ३०-५४ अंतर्गत सुमारे १५ लाख रूपयांचे कामे ३० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता पदान करण्यात आली होती. सर्वसाधारण सभेतील ही मंजूर केलेली विकास कामे बांधकाम समितीने रद्द करून हा निधी दुसरीकडे वळविला होता. मात्र, मुरुमकर यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रशासनाला दोन पावले मागे सरकावे लागले.
प्रशासकीय मंजुरीसाठी झेडपी सदस्याचा ठिय्या
By admin | Updated: December 29, 2016 01:48 IST