शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी विश्रामगृहात सदस्य - कर्मचाऱ्यांत जुंपली

By admin | Updated: July 27, 2016 00:10 IST

जिल्हा परिषदेच्या मालकीचे मालटेकडी जवळ विश्रामगूह आहे.

तक्रार : अध्यक्षांकडे सुरक्षेची मागणी, आरक्षणाविना मुक्कामअमरावती: जिल्हा परिषदेच्या मालकीचे मालटेकडी जवळ विश्रामगूह आहे. या ठिकाणी सोमवारी रात्री मेळघाटातील जि.प. सदस्य सदाशिव खडके यांनी विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांशी वाहन पार्किंग व खोलीच्या कारणावरून वाद केल्याची तक्रार येथील कर्मचाऱ्यांची मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. जिल्हा परिषद सदस्य २५ जुलै रोजी रात्री विश्रामगृहात आले. काही वाहने पोर्चमध्ये उभी होती. ही वाहने हटवितांना वेळ लागल्याने सदस्यांनी अचानक कर्मचाऱ्यांना शिविगाळ सुरू केली. त्यांना खोली नसल्याने ते भडकले व कर्मचाऱ्यांशी वाद केल्याचे अध्यक्षांकडे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या सततच्या जाचाला कंटाळून यापूर्वीही कर्मचाऱ्यांनी बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या आहेत.विशेष म्हणजे या विश्रामगृहात आरक्षण न करताच बरेच सदस्य येऊन राहतात. त्यामुळे आरक्षणाशिवाय कक्ष देण्यात येऊ नये. सोबतच या ठिकाणी बाहेरील लोकांचा वाढलेला हैदोस व मद्यपींचा धुमाकूळ तत्काळ थांबविण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी अध्यक्षांकडे केली आहे. दरम्यान या संदर्भात बांधकाम विभागाशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन अध्यक्ष सतीश उईके यांनी कर्मचाऱ्यांना दिले. यावेळी भारत हांडे, विठ्ठल भांड, शेख बशारत शेख करामत, गजानन देशमुख, गणेश वानखडे, मनोहर फुले, अनिल बरसैय्या आदीची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)सीसीटीव्ही लागणारजिल्हा परिषद विश्रामगृहात वाढलेल्या मद्यापींचा हैदोस रोखण्यासाठी या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. याशिवाय पोलीस संरक्षण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेतले जाईल. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश अध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. याची तातडीने अंमलबजावणी करण्याचेही त्यांनी सुचविले आहे.