शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

११ कोटींसाठी ‘झेडपी’ काकूळतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 22:55 IST

पाणीटंचाई आराखड्याप्रमाणे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने १ जानेवारी ते ३० जूनपर्यंत सुमारे ११ कोटी १२ लाख ३० हजार रूपयांचे कामे पूर्ण केलीत. तथापि तो निधी पावसाळा संपत असतानाही न मिळाल्याने जिल्हा परिषद यंत्रणा काकूळतीला आली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई : ग्रामपंचायतींचा निधीसाठी ससेमिरा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाणीटंचाई आराखड्याप्रमाणे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने १ जानेवारी ते ३० जूनपर्यंत सुमारे ११ कोटी १२ लाख ३० हजार रूपयांचे कामे पूर्ण केलीत. तथापि तो निधी पावसाळा संपत असतानाही न मिळाल्याने जिल्हा परिषद यंत्रणा काकूळतीला आली आहे.दुसरीकडे पाणी टंचाई निवारणार्थ केलेल्या कामांचा निधी मिळण्यासाठी ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा विभागाकडे ससेमिरा लावला आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून आराखडा तयार केला जातो. त्यानुसार सन २०१७-१८ साठीचा आराखडा तयार करण्यात आला. त्यास जिल्हाप्रशासनाने मान्यताही दिली. आराखड्यानुसार, जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीटंचाई निवारणार्थ १५.६३ कोटींची कामे पुर्ण केली. त्यात जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामार्फत ११ कोटी १२ लाख ३० हजार, तर मजीप्राने ४ कोटी ५१ लाखांची कामे जानेवारी ते ३० जूनदरम्यान पूर्ण केली. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाणी टंचाई आराखड्यातील बहुतांश कामे ही ग्रामपंचायतींने केली आहेत. तर काही कामे कंत्राटदारांनी केले आहे. पाणी टंचाईचे कामे ३० जून पूर्ण झाली आहेत. मात्र आराखडा मंजूरी पासून तर अद्यापर्यत टंचाई आराखडयातील झेडपीला आवश्यक असलेल्या ११ कोटी १२ लाख ३० हजार रूपयांच्या निधीतील एक रूपयाही उपलब्ध झाला नसल्याचे सुत्रांनी सांगितले. परिणामी पाणी टंचाईचे कामे केलेल्या ग्रामपंचायती व कंत्राटदारांना देयके मिळविण्यासाठी दररोज पाणी पुरवठा विभागाकडे फेऱ्या माराव्या लागत आहेत. अशातच आता पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास उपाय योजना करण्यासाठी निधी नाही. तर दूसरीकडे मागील देयके न मिळाल्याने संभाव्य कामे करण्यास कुणीही पुढाकार घेणार नसल्याची चर्चा झेडपीत सुरू आहे. त्यामुळे पाणी टंचाईचा रखडलेला निधी त्वरित देण्याची मागणी होत आहे.टंचाई आराखड्यातील ही कामे झाली पुर्णपाणी टंचाईच्या निवारण आराखडयातून जानेवारी ते जूनपर्यत विंधन विहीर,कुपनलिके ची २०८, नळ योजनांची विशेष दूरूस्ती करणे जिल्हा परिषदेकडील १०५, तात्पुरत्या पुरक नळ योजनेची ५० , टँकर व बैलगाडीने पाणी पुरवठा करण्याची १३, खासगी विहीर अधिग्रहणाची १५३ व विहीर खोलीकरणाची २ या प्रमाणे कामे पूर्ण करण्यात आली. झेडपी व मजीप्रा मिळून ६०९ कामे पूर्ण केली आहेत.यापोटी १५.६३ कोटी रूपयांचा निधी आवश्यक आहे.यात झेडपीला ११ कोटी १२ लाख ३० हजार तर मजीप्राला ४ कोटी ५१ लाख रुपये उपलब्ध करुन द्यावे, यासाठीचा प्रस्ताव पुरवठा विभागाने शासनाकडे पाठविला आहे.पाणी टंचाई आराखडयातील कामे ३० जूनपर्यत पूर्ण केली. त्यासाठी झेडपीने ११.१२ कोटींचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला. त्यावर तुर्तास निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे टंचाईचे कामे करणाºया ग्रामपंचायती व इतरांना देयके अदा करता आली नाहीत.निधी उपलब्ध होताच देयके दिली जातील- राजेंद्र सावळकरकार्यकारी अभियंतापाणी पुरवठा विभाग, झेडपी