शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाबंदी कागदोपत्री; बिनधास्त दळणवळण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST

फोटो पी ०४ तिवसा पान २ चे लिड तिवसा : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने १५ मे पर्यंत ...

फोटो पी ०४ तिवसा

पान २ चे लिड

तिवसा : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने १५ मे पर्यंत संचारबंदी वाढवली. आंतरजिल्हा प्रवेशावरही बंधन आणले. ई-पासशिवाय कोणालाही इतर जिल्ह्यातून ये-जा करण्यास बंदी घातली आहे. मात्र, तिवसा तालुक्यात ती बंदी निव्वळ कागदोपत्री दिसत आहे. कोण कुठून येत आहे, कोण कुठे जात आहे, याचा लेखाजोखा कुठल्याही यंत्रणेकडे नाही. बिनधास्त दळणवळण सुरू आहे. कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे तिवसा तालुका ‘हॉट स्पॉट’ बनला असतानाही प्रशासनासोबतच नागरिकांचा निष्काळजीपणा संकटात भर टाकणारा ठरला आहे.

जिल्हाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर तिवसा पोलिसांच्यावतीने वरखेड फाट्याजवळ बॅरिकेड लावण्यात आली. तेथे नाकाबंदी करीत पोलीस चौकीदेखील तैनात करण्यात आल. मात्र, आता ती पोलीस चौकी शोभेची वस्तू बनली आहे. तेथे केवळ बॅरिकेड शिल्लक आहेत. येथून सर्रासपणे वाहनांची ये-जा सुरू आहे. कोणत्याही प्रकारची तपासणी तेथे केले जात नाही.

राज्यात कोरोनाचा अक्षरशः उद्रेक होत आहे. त्यामुळे संक्रमणाची साख‌ळी तोडण्यासाठी कठोर जिल्हाबंदी घालण्यात आली. यात केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रवेश देण्यात यावा, तर ई-पासशिवाय कोणालाही दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास बंदी घालण्यात आली. मात्र, हे केवळ कागदावर दिसून येत आहे. तिवसा पोलीस ठाण्याच्यावतीने लावण्यात आलेले चेक पोस्ट देखावा बनले आहेत. येथे एखादेवेळी पोलीस बसले असतात. मात्र, ते कोणालाही अडवत नाही. साधी विचारपूसदेखील करीत नाहीत. त्यांच्या निरुपद्रवीपणामुळे शासनादेशाला तिलांजली दिली गेली आहे.

बॉक्स

तिवसा हे गाव अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तालुका मुख्यालयाचे गाव आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत जिल्हाबंदी असूनही येथून सुसाट वाहतूक सुरू असते. या मार्गावरील वाहने तिवसा येथे थांबतात. या थांबलेल्यापैकी कोण कोरोना पॉझिटिव्ह, हे कळायला मार्ग नाही. तपासणी नाक्यावर कुणाचीही अँटिजेन तपासणी केली जात नाही. जिल्ह्यात येणाऱ्यांना आरटी-पीसीआर किंवा अँटिजेन अहवाल मागितला जात नाही.

या बातमीत दोन कोट येत आहेत.