शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शाळेत शिक्षण घेतलेली रूपाली एमपीएससीत अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 22:17 IST

खाजगी इंग्रजी शाळेत शिक्षण व मुंबई-पुण्या सारख्या शहरातच पूर्वतयारीचे धडे गिरविल्यानंतरच एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होता येते, प्रशासकीय सेवेतील प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांची पदे मिळविता येतात, असा समज आहे. मात्र, हा समज खोडून काढत जिल्हा परिषद मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या रुपाली मोगरकरने एमपीएसी परीक्षेत ठसा उमटविला आहे.

ठळक मुद्देअस्मिता मराठीची : धामणगाव तालुक्याचा बहुमान

मोहन राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : खाजगी इंग्रजी शाळेत शिक्षण व मुंबई-पुण्या सारख्या शहरातच पूर्वतयारीचे धडे गिरविल्यानंतरच एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होता येते, प्रशासकीय सेवेतील प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांची पदे मिळविता येतात, असा समज आहे. मात्र, हा समज खोडून काढत जिल्हा परिषद मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या रुपाली मोगरकरने एमपीएसी परीक्षेत ठसा उमटविला आहे. शुक्रवारी घोषित झालेल्या एमपीएससी परीक्षेच्या निकालात राज्यात मुलींमधून प्रथम आलेल्या रुपाली मोगरकरने धामणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा बहुमान अधिक वाढविला आहे. शेंदुरजना खुर्द येथे अप्पर वर्धा विभागात कालवा निरीक्षक देविदास मोगरकर यांची रूपाली ही मुलगी. एमपीएससी परीक्षेत राज्यात चौथी तर मुलींमध्ये पहिली आली आहे. रूपालीचे पाचवी ते सातवीपर्र्यतचे शिक्षण शेंदुरजना खुर्द येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत झाले. येथील एकता विद्यालयातून दहावीला तिने ८२ टक्के गुण घेतले. त्यानंतर वडिलांची बदली यवतमाळ येथे झाल्याने तिथेच बारावी व जिल्हा शिक्षण प्रशिक्षणमधून डीएड केले. तदनंतर रूपाली सन २०१२ मध्ये जलसंपदा विभागात रूजू झाली.अनेक परीक्षा केल्या उत्तीर्णशासकीय सेवेत असताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात इतिहास, अर्थशास्त्र व इंग्रजी वाड:मय या विषयात तिने पदवी मिळविली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून एमए अर्थशास्त्र केले. मुंबई, पुण्यात एमपीएससीच्या परीक्षेचे वर्ग न करता अमरावती शहरातच तिने एमपीएससीची तयारी केली. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुरवठा निरिक्षक, कर व निर्धारण प्रशासकीय अधिकारी, राज्य गुप्त विभागात सहाय्यक गुप्त अधिकारी अशा शासकीय सेवेसाठी असलेल्या स्पर्धा परीक्षा रुपालीने उत्तीर्ण केल्या. नुकत्याच निकाल घोषित झालेल्या एमपीएससी परीक्षेत ती महिला बालविकास विभागात राज्यातून मुलींमधून पहिली ठरली. रुपालीचा मोठा भाऊ अक्षय मोगरकर हे कार्यकारी अभियंता पॉवर ग्रेड अधिकारी तर रितेश हा व्यापारी क्षेत्रात आहे.