शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उत्तुंग पाषाण भिंतीच्या आतही झिंग.. झिंग.. झिंगाट...

By admin | Updated: October 29, 2016 00:14 IST

तुरुंग म्हटले की गुन्हेगारांचे वेगळे विश्व. मात्र या गुन्हेगारांच्या हातानांही कला, कौशल्य, निपुणता, गुण असल्याचा प्रत्यय शुक्रवारी अनुभवता आला.

अमरावती कारागृहात दिवाळी साजरी : नृत्य, लावणी, कव्वाली, गझल, नाट्यांची मैफलअमरावती : तुरुंग म्हटले की गुन्हेगारांचे वेगळे विश्व. मात्र या गुन्हेगारांच्या हातानांही कला, कौशल्य, निपुणता, गुण असल्याचा प्रत्यय शुक्रवारी अनुभवता आला. दिवाळी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बंदीजनांनी नृत्य, लावणी, कव्वाली, गझल, नाट्याचे सादरीकरण करून उपस्थिताना काळ खिळवून ठेवले. समारोपानंतर अधिकारी, बंदीजनांनी एकत्र येऊन झिंग, झिंग, झिंगाट या गाण्यावर तुफान नृत्य करीत कारागृहात सैराटमय वातावरण निर्माण केले.मध्यवर्ती कारागृहात संत गाडगेबाबा प्रार्थना मंदिरात शुक्रवारी दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अचलपूरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश मुजीब शेख व त्यांच्या पत्नी जेहरुनिस्सा शेख, अर्थविषयक सल्लागार अर्चना पाटील, कारागृह अधीक्षक भाईदास ढोले, स्टेट बँकेचे विलास बिंदोर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक जाधव, पांडुरंग भुसारे, भगवान सदांशिव, रेवननाथ कानडे, महिला तुरुंगाधिकारी ज्योती आठवले, मोहन चव्हाण, सांस्कृतिक विभागप्रमुख भूषण कांबळे, गोवर्धन लांडे, दादाराव लांडे, लिला सावरकर, यादव मदनकर आदी उपस्थित होते. ओंकार स्वरुपा सदगुरु समर्था अनाथांच्या नाथा तूज नमो.. तूज नमो... या गीताने दिवाळी उत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर आईचा गोंधळ, कव्वाली, गजल, गीतांची मैफल रंगत गेली. दिलीप गवई व प्रल्हाद मोरे यांनी ‘सोडून द्या अहमपणा जिजाऊ बना, सावित्री बना अन् रमाई बना’ आदी गीतांनी उपस्थित महिला, पुरुष बंद्यांच्या काळीज जिंकले. रामेश्वर उजेड यांनी ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ सादर केलेल्या लावणीने अनेकांच्या मनाचा ठाव घेतला. भारूड, गोंडी गीत, मिमेक्री, दोन पात्री नाट्य, कोंबडी पळाली नृत्य सादर करण्यात आले. दरम्यान एका बंद्याने ‘घर के चिराग ने घर को जला दिला, जिसको हसाया मैने उसने ही रुला दिला’ ही गायिलेली गजल आजचा सामाजिक भाव सांगून गेली. चार भिंतीच्या आत साजरी करण्यात आलेली दिवाळी ही हिंदू-मुस्लिमांच्या एकात्मतेचे प्रतीक ठरले. दिवाळीनिमित्त शुक्रवारी आयोजित विविध कार्यक्रमात पहिल्यांदाच महिला, पुरुष बंदीजनांना एकत्र आणण्याचा प्रयोग करण्यात आला. बंदीजनांमध्ये माणुसकी आणि समाजाप्रति चांगली भावना निर्माण व्हावी, यासाठी सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. याअनुषंगाने शुक्रवारी मध्यवर्ती कारागृहात दिवाळी उत्सव साजरा करण्यात आल्याचे मनोगत कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी व्यक्त केले. वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक जाधव यांनी दिवाळी उत्सव साजरा करण्यासाठी घेतलेला पुढाकार अतिशय मोलाचा ठरला आहे. (प्रतिनिधी)आठ बंदीजन उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानितपाषाण भिंतीच्या आत हातून कळत-नकळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त करीत न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी शिक्षा भोगत आहेत. मात्र या बंदीजनांमध्ये समाजाप्रती आदर, सन्मान निर्माण व्हावा, यासाठी विविध उपक्रम राबविले जाते. त्याच अनुषंगाने आठ बंदीजनांना उत्कृष्ट बंदीजन म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात दिनकर नरोटे, रामेश्वर उजेड, सुदर्शन विघ्ने, दिलीप गवई, शंकर उईके, सादेराव कपाटे, बबन थोरात, धनराज सुरोशे यांचा समावेश आहे.