शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या ‘मेगा भरती’ला ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:16 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा परिषदेतील बऱ्याच वर्षांपासून रिक्त असलेल्या ३३४ पदांच्या ‘मेगा भरती’ला ब्रेक लागला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने भरतीसाठी पाठविलेला प्रस्ताव राज्य शासनाकडून ‘थंडबस्त्यात’ टाकण्यात आला असून, राज्यभरात एकाच वेळेस भरती प्रक्रिया घेण्याची तयारी सुरू आहे. त्यातच कर्जमाफी योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडल्याने किमान वर्षभर तरी भरती होणार ...

ठळक मुद्देशासनाकडून प्रस्ताव थंडबस्त्यात : समितीचे अधिकार काढून घेतले

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा परिषदेतील बऱ्याच वर्षांपासून रिक्त असलेल्या ३३४ पदांच्या ‘मेगा भरती’ला ब्रेक लागला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने भरतीसाठी पाठविलेला प्रस्ताव राज्य शासनाकडून ‘थंडबस्त्यात’ टाकण्यात आला असून, राज्यभरात एकाच वेळेस भरती प्रक्रिया घेण्याची तयारी सुरू आहे. त्यातच कर्जमाफी योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडल्याने किमान वर्षभर तरी भरती होणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत.अनेक वर्षापासून रिक्त असलेली ३३४ पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेने राज्य शासनाला प्रस्ताव पाठविला होता. मात्र प्रस्तावाला अजूनही ‘हिरवा कंदील’ मिळालेला नाही. यावर्षीच्या शासन निर्णयानुसार वर्ग ३ च्या पदांसाठी आता राज्य शासनातर्फे आॅनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून, यापूर्वी जिल्हा परिषद भरतीसाठी असलेल्या अधिकाºयांचा समितीचे अधिकारही काढून घेण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या अधिनस्त विभागामध्ये वर्ग तीन संवर्गाच्या ३३४ जागा रिक्त आहेत. यापूर्वी या जागा भरण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची नेमणूक होती. या निवड समितीमार्फत सर्व विभागांच्या वर्ग ३ च्या पदांची भरती करण्यात येत. अशाप्रकारे भरती करत असताना परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासणे आदी बाबींसाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर जिल्हास्तरीय अधिकाºयांचा बराच वेळ वाया जात होता. त्याचा परिणाम विकासकामांवर होत होता. त्यामुळे जिल्हा परिषदेतील वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया आॅनलाइन राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार १९ आॅक्टोबर २००७ च्या शासन निर्णयानुसार गठित करण्यात आलेल्या समितीच्या सभेतून जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ च्या पदांची भरती वगळण्यात आली आहे. मात्र, राज्याचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी भरतीची प्रक्रिया तात्पुरती तरी थांबविण्याच्या निर्णयाप्रत राज्य सरकार आले आहे. निवड केलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे सीईओंमार्फत तपासण्यात येणार आहेत. परीक्षेचा निकाल हा आॅनलाइन अपलोड करण्यात येणार आहे. तपासणीनंतर त्यांची कागदपत्रे ज्या प्रवेश नियमानुसार योग्य असतील, त्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे. मात्र, भरतिप्रक्रियेला हिरवा कंदील कधी मिळतो, यावर पुढील दिशा अवलंबून आहे.जिल्हा परिषदेतील भरतीयोग्य रिक्त पदांची माहिती यापूर्वीच शासनाला पाठविण्यात आली आहे. राज्य शासनातर्फे नवीन शासननिर्णयानुसार भरती प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीनेच राबविण्यात येईल. शासनाकडून याबाबत अजून काही आदेश आले नाहीत. आदेशानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल.- कै लास घोडके,डेप्युटी सीईओ