शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे महिला समुपदेशन केंद्र कागदावर

By admin | Updated: April 6, 2015 00:21 IST

कुटुंबातील मारहाण, लैंगिक छळ व इतर समस्यांनी ग्रस्त तसेच मानसिकदृष्ट्या असंतुलित महिलांच्या सामाजिक, मानसशास्त्रीय व कायदेशीर समुपदेशनासाठी

वर्षाला दीड लाखांचा चुना : महिला, बालकल्याण विभागाची योजनागजानन मोहोड अमरावतीकुटुंबातील मारहाण, लैंगिक छळ व इतर समस्यांनी ग्रस्त तसेच मानसिकदृष्ट्या असंतुलित महिलांच्या सामाजिक, मानसशास्त्रीय व कायदेशीर समुपदेशनासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने तालुकास्तरावर स्वयंसेवी संस्थांद्वारा समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात ८ तालुक्यांत अशी केंद्र आहेत. यापैकी दोन केंद्र बंद आहेत. विभागाच्या सेस फंडातून या केंद्रांना१० टक्के अनुदान मिळते. परंतु केंद्रांची सध्याची अवस्था व निवाडे झालेली प्रकरणे पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ही केंद्र कागदोपत्रीच असल्याचे धक्कादायक चित्र आहे. जिल्ह्यात अमरावती, नांदगाव खंडेश्वर, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, तिवसा, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर व धामणगाव तालुक्यात समुपदेशन केंद्र सुरू आहेत. जि.प.च्या त्रिसदस्यीय समितीमार्फत केंद्रांची निवड करण्यात येते. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी या समितीचे अध्यक्ष असतात. सचिव म्हणून महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी काम पाहतात. सदस्य म्हणून समाजकल्याण अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश असतो. या जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील केंद्राबाबत जिल्हा समन्वयकांकडून अहवाल घेतला नसल्याची माहिती आहे. यापैकी दोन केंद्र बंद अवस्थेत आहे. मार्च अखेरीस अनुदानासाठी संस्थेकडून प्रस्ताव येतात. महिला व बालकल्याण विभागाच्या सेस फंडातून दीड लाख रूपयांचे अनुदान या केंद्रांना वर्षाकाठी विभागून दिले जाते. केंद्राच्या तरतुदी ग्रामविकासच्या १९ डिसेंबर २००७ च्या परिपत्रकानुसार सदर योजना महाविद्यालय किंवा तज्ज्ञांच्या संस्थांमार्फत राबवावी. ज्या संस्थांकडे यापूर्वीच अशा प्रकारच्या समुपदेशनासाठी आवश्यक मनुष्यबळ, जागा, अनुभव व सोईसुविधा उपलब्ध आहे, असे प्रस्ताव मंजूर करावेत.महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने जिल्ह्यात ८ तालुक्यांत महिला समुपदेशन केंद्र असूून यापैकी २ केंद्र बंद आहेत. या विभागाच्या सेस फंडाच्या १० टक्के अनुदान देण्यात येते. या संस्थांकडून व जिल्हा समन्वयकांकडून अहवाल मागविला जाईल, त्रुटी आढळल्यास केंद्र रद्द केले जाईल. -कैलास घोडके,उपमुख्य कार्यकारी अधिकारीमहिला व बालकल्याण.