अमरावती : ग्रामीण भागातील २ हजार ४४५ अंगणवाड्या लगतच्या शाळांना आता लिंक करण्यात येणार आहे. अंगणवाडी अधिक दर्जेदार करण्यासोबतच जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढविण्याचा उद्देश यामागे असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाची सुरुवात अंगणवाडीपासून होते. त्यामुळे अंगणवाडी दर्जेदार असायला पाहिजे. त्यासाठी अंगणवाडीमध्ये मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यावर शिक्षण विभागाचा भर आहे. सध्याच्या स्थितीत अंगणवाडीची स्थिती चांगली असली तरी अनेक अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत आहेत. काही तर काही ग्रामपंचायत, समाज मंदिर आदी ठिकाणी भरत आहेत. एक शाळा एक अंगणवाडी किंवा एक शाळा दोन अंगणवाडी या तत्त्वावर अंगणवाड्या शाळांना लिंक करण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी नुकतेच दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील २४४५ अंगणवाड्या या लगतच्या शाळांना लिंक करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागातील सुत्रांनी दिली. दरम्या राज्य शासनाकडून प्राप्त आदेशानुसार येथील प्राथमिक शिक्षण विभागाने यासंदर्भातील माहितीचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे.यावर अद्याप अंतिम निर्णय झाला नसला तरी यावर निर्णय झाल्यानंतर शासनाच्या वतीने शाळांसाठी निधी देण्यात येतो याचा उपयोग अप्रत्यक्षपणे अंगणवाड्यानाही होणार आहे.
बॉक्स
पालकांना दुसरीकडे जाण्याची गरज नाही!
ग्रामीण भागात अंगणवाड्यांमध्ये पालक मुलांना टाळतात त्यानंतर मुलांना दूर असलेल्या शाळांमध्ये प्रवेश द्यावा लागतो. यामुळे पालक खाजगी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देतात.
काही खासगी शाळांकडून या प्रकारचा फायदा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे ओढण्याची शाळांमध्ये अंगणवाडी असल्यास पालकांना दुसरीकडे जाण्याची गरज भासणार नाही.
कोट
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशानुसार याबाबतची माहीती संकलित करून तसा अहवाला शासनाकडे सादर केला आहे.यावर पुढील निर्णय वरिष्ठ स्तरावर होईल.यानंतर दिलेल्या सूचनेप्रमाणे कारवाई केली जाईल.
- एजाज खान,
शिक्षणाधिकारी प्राथमिक