थाटले प्रतिकात्मक उपाहारगृह आंदोलन : ओम साई महिला बचत गट आक्रमक अमरावती : जिल्हा परिषद परिसरात असलेले उपाहारगृह ओम साई स्वयंसहाय्यता महिला बचत गटाला देण्यात यावे या मागणीसाठी मंगळवारी जिल्हा परिषद आवारात प्रतिकात्मक उपहारगृह थाटून अभिनव आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणून सोडले. अचानक सुरू झालेल्या या आंदोलनाने प्रशासकीय यंत्रणेत मात्र चांगलीच खळबळ उडाली होती .जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या परिसरात सन १९९१ पासून जिल्हा परिषद सेवकांची पतपुरवठा सहकारी संस्था चालवत होती. मात्र ही संस्था काही कारणास्तव सन २०१२ मध्ये जिल्हा उपनिबंधक यांनी संस्थेच्या संचालकांना बाजु मांडण्यासाठी बोलविले मात्र आर्थीक अनियमिततेमुळे निबंधक यांनी ही संस्था अवसायनात काढली आहे. त्यामुळे या संस्थेचे उपाहारगृह एका खासगी व्यावसायीकाला चालविण्यास देण्यात आले आहे. सदर उपाहारगृह ओम साई स्वयंसहायता महिला बचत गट देवीनगर वडाळी यांना चालविण्यासाठी देण्यात यावे, अशी मागणी काही दिवसांपूर्वी बचत गटाने केली होती.
जिल्हा परिषद आवारात
By admin | Updated: July 15, 2015 00:07 IST