शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जाज्वल्य देशभक्तीचा जोश

By admin | Updated: January 26, 2017 00:33 IST

६७ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त शहरात जय्यत तयारी झाली आहे.

विभागीय क्रीडा संकुलात मुख्य कार्यक्रम अमरावती : ६७ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त शहरात जय्यत तयारी झाली आहे.यानिमित्ताने विविध शासकीय, निमशासकीय, खासगी संस्था, संघटनांद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी २६ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता मोर्शी रोडवरील जवाहलाल नेहरु स्टेडियम येथे पालकमंत्री ध्वजारोहण करतील. यावेळी विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता यांच्यासह बहुंताश शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रजासत्ताक दिनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाकडूनही यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. जिल्हा स्टेडियम येथील सुरक्षेसाठी तीन सहायक पोलीस आयुक्त, दहा पोलीस निरीक्षक, ३५ पोलीस उपनिरीक्षक, २२५ पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. त्याचप्रमाणे इर्विन चौक ते जिल्हा स्टेडियमपर्यंत वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रण करणार आहेत. प्रजासत्ताक दिनी कोणताहीी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून शहरातील विविध ठिकाणांची तपासणी केली जात आहे. बसस्थानक, मोठे हॉटेल, रेल्वे स्थानक, मंदिरे आदी ठिकाणांची तपासणी करण्यात आली आहे.शहरात मर्च्युरी पॉईन्टजवळ आढळलेल्या बेवारस कारची बीडीडीएस पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना केल्या जात आहे‘अतिउत्साही’ तरूणाईवर लगाम प्रजासत्ताक दिनी तरुणाईच्या उत्साहाला उधाण येते. मात्र, अनेकदा कर्णकर्कश आवाजात ओरडणे, ट्रीपल सिट भरधाव वेगाने वाहने पिटाळणे, ध्वनीप्रदूषण करणे, रेसर्स बाईकने धुमाकूळ घालणे आदी प्रकार घडतात. यामुळे प्रजासत्ताकदिनाच्या पावित्र्याला गालबोट लागते. यामुळे यंदा अशा अतीउत्साही तरूणाईवर लगाम कसण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले असून असा प्रकार आढळल्यास दोषींवर कठोर कारवाईचे प्रावधान आहे. बडनेरा नवीवस्तीतील जयहिंद मैदानात प्रजासत्ताक दिनी शहरातील शाळांचे विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. झेंडावंदन आटोपल्यानंतर सांस्कृ तिक कार्यक्रमांच्या मेजवानीसाठी शहरवासी एकत्र येतात. नृत्य, सामूहिक कला प्रदर्शन, साहसी उपक्रमांच्या सादरीकरणाचा हा शिरस्ता वर्षानुवर्षे सुरु आहे. महापालिकेच्या पुढाकाराने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.