शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाचे उत्साहात स्वागत तरुणांनी राखला संयम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST

दरवर्षी नववर्षाच्या स्वागताला उत्साहाच्या भरात एखादी अप्रिय घडून गालबोट लागते. त्यामुळे मंगळवारी पोलिसांनी शहरातील चौकाचौकांत तगडा बंदोबस्त लावला होता. कडाक्याच्या थंडीतही पोलीस नागरिकांच्या, तरुणाईच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर सज्ज होते. मात्र, यंदा रस्त्यावर लोकांचे आवागमन खूपच कमी असल्याचे आढळले. हा थंडीचा प्रभाव की पोलिसांच्या बंदोबस्ताचा, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

ठळक मुद्देथंडीचा प्रभाव : पोलिसांच्या तगड्या बंदोबस्ताचीही धास्ती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘थर्टी फर्स्ट’ हा उत्साहाचा उत्सवच. यंदाही तोच उत्साह नववर्षाचे स्वागत करताना अमरावतीकरांमध्ये दिसून आला. मात्र, यंदा नववर्षाचे स्वागत कमालीच्या संयमाने झाले. अर्थात थंडीचा कडाका आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त होताच. यंदा तरुणाईने नववर्षांचे जल्लोषात, पण शांततेत स्वागत केले, हे विशेष.दरवर्षी नववर्षाच्या स्वागताला उत्साहाच्या भरात एखादी अप्रिय घडून गालबोट लागते. त्यामुळे मंगळवारी पोलिसांनी शहरातील चौकाचौकांत तगडा बंदोबस्त लावला होता. कडाक्याच्या थंडीतही पोलीस नागरिकांच्या, तरुणाईच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर सज्ज होते. मात्र, यंदा रस्त्यावर लोकांचे आवागमन खूपच कमी असल्याचे आढळले. हा थंडीचा प्रभाव की पोलिसांच्या बंदोबस्ताचा, असा प्रश्न उपस्थित झाला होता.दरम्यान, अमरावतीकरांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी रात्री १२ च्या ठोक्याला २०२० या नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. ठिकठिकाणी आकाशात आतषबाजी करण्यात आली. बहुतांश नागरिकांनी आपआपल्या घरी किंवा निश्चित केलेल्या ठिकाणी जल्लोष करून नववर्षाचे उत्साहात स्वागत केले. गल्लीबोळातून हॅपी न्यू ईअरच्या जल्लोष झाला. मात्र, रस्त्यावर उतरून जल्लोषाचा, उद्दामपणाचा प्रकार झाला नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. विशेष म्हणजे, यंदा तरुणाईने संयम राखला. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल, असे कृत्य केले नाही. त्याबाबत पोलिसांनीही तरुणाईचे कौतुक केले.पाच वेगवान वाहने, तीन तळीरामांविरुद्ध कारवाईवाहतूक शाखेच्या पूर्व-पश्चिम झोनच्या पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी फिक्स पॉइंट लावून वाहन तपासणी केली. यामध्ये पोलिसांनी नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या १८४ वाहनांवर कारवाई करीत ३६ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला. ब्रीथ अ‍ॅनालायझरद्वारे वाहनचालकांची तपासणी करून ड्रँक अँड ड्राइव्हप्रकरणी तीन आणि वाहनवेगाची मर्यादा ओलांडणाºया पाच जणांविरुद्ध कारवाईचा बडगा वाहतूक पोलिसांनी उगारला.अमरावतीकरांनी नववर्षाचे स्वागत उत्साहात केले. मात्र, थंडीच्या प्रभावामुळे बहुतांश नागरिक घराबाहेर पडले नाहीत. रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कमी असल्यामुळे अप्रिय घटनांची नोंद झालेली नाही. तथापि, नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात होतेच.- संजयकुमार बाविस्कर, पोलीस आयुक्त

टॅग्स :New Yearनववर्ष