शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून युवकाने घेतले जाळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 23:01 IST

तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेसमोर एका युवकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता घडली. २५ वर्षीय युवकाचा कोळसा होऊन घटनास्थळी मृत्यू झाला. एकतर्फी प्रेमातून युवकाने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.

ठळक मुद्देशेंदोळा खुर्द येथील घटना : अंडरपासमध्ये भरदुपारी घडला थरार

लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेसमोर एका युवकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता घडली. २५ वर्षीय युवकाचा कोळसा होऊन घटनास्थळी मृत्यू झाला. एकतर्फी प्रेमातून युवकाने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.मोर्शी तालुक्यातील मंगरूळ भिलापूर येथील रहिवासी असलेला २५ वर्षीय युवक शुभम बाळू बोरकर हा तिवसा तालुक्यातील शेंदोळा बुजरूक येथे आपले मामा अनिरुद्ध मंडळे यांच्याकडे आला होता. काही कारणास्तव तो दुपारी ३ वाजताच्या सुमारास शेंदोळा खुर्द येथे आला होता.शेंदोळा येथील भारतीय स्टेट बँक परिसरात एमएच २७ एएक्स २५१३ क्रमांकाची दुचाकी शुभमने उभी केली. यानंतर दुचाकीतील पेट्रोल एका बॉटलमध्ये काढून बँकेपासून काही अंतरावर असलेल्या उड्डाणपुलाच्या अंडरपासमध्ये अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.शुभम बोरकर हा गावातील एका युवतीवर एकतर्फी प्रेम करीत असल्याची माहिती तिवसा पोलिसांनी याप्रकरणी दिली. तिवसा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतक शुभमचे मामा अनिरुद्ध यांचे बयान नोंदविले असून सहायक पोलीस निरीक्षक शीतल खोब्रागडे पुढील तपास करीत आहेत.एकतर्फी प्रेमातून घटना!शुभमचे गावातील एक मुलीवर प्रेम जडले होते. मात्र, ते एकतर्फी होते. याच कारणावरून त्याने आत्महत्येपर्यत मजल गाठली होती, अशी चर्चा दबक्या सुरात होत आहे.