शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

युवा स्वाभिमानचे म्याऊ आंदोलन पोलिसांनी लावले उधळून

By admin | Updated: April 26, 2016 00:11 IST

जिल्हा परिषदेत वाढत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात युवा स्वाभिमान संघटनेने सोमवारी जिल्हा परिषद

कार्यकर्ते आक्रमक : पदाधिकाऱ्यांसह महिलांनाही अटक, पोलिसांचा तगडा बंदोबस्तअमरावती : जिल्हा परिषदेत वाढत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात युवा स्वाभिमान संघटनेने सोमवारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व आरोग्य अधिकारी यांची खुर्ची जप्त करून त्याचा लिलाव करण्यासाठी म्याऊ आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी प्रवेशव्दारावरच रोखले. त्यामुळे काहीवेळ जिल्हा परिषद परिसरात तणाव निर्माण झाला होता.जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या विविध विकासकामात बांधकाम विभागाकडून शासन निर्णयानुसार ३३.३३.३४ या रेशोअंतर्गत कामे ही ३३ टक्के सुशिक्षित बेरोजगार अभियंता व सोसायटींना ३३ टक्के यानुसार खुल्या निविदा काढणे आवश्यक आहे. याशिवाय तीन लाखांवरील कामासाठी ई-निविदा जाहीर करायला पाहिजे. परंतु असे न करता बांधकाम विभागाने सरळसरळ मोठ्या कामांचे तीन लाखांचे तुकडे पाडून या कामांची सुशिक्षित बेरोजगार, सोसायटी यांना ३ लाख रूपयांच्या खुल्या निविदा करून १० टक्के कमिशन बेसवर विकण्याचा कट रचला आहे. ही कामे मर्जीतील व्यक्तींना देऊन कामे निकृष्ट केली जात आहे. त्यामुळे या कामात मोठी अनियमितता केली आहे. ८ पीएच लेखाशीर्षाखाली आरोग्य विभागातून मंजूर करण्यात आलेली कोट्यवधींची कामे तुकडे पाडून मेळघाटातील आदिवासी विकास कामांची वाट लावणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. पोलीस आंदोलकांमध्ये चकमकअमरावती : युवा स्वाभिमान संघटनेचे मेळघाट संपर्क प्रमुख उपेन बच्छले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयापासून जिल्हा परिषदेत आंदोलन करण्यासाठी येणाऱ्या युवा स्वाभिमान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या प्रवेशव्दारावरच पोलिसांनी रोखले. त्यामुळे काही वेळ पोलिस व आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे आंदोलकांना पोलिसांनी आंदोलनापूर्वीच ताब्यात घेतले. यावेळी आंदोलन कर्त्यासह मांजर सोबत घेऊन जिल्हा परिषदेत शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलक कार्यकर्त्यालाही पोलिसांनी अटक केली. त्यामुळे आंदोलन या ठिकाणीच निवळले या आंदोलनात उपेन बच्छले, चेतन बाळापुरे, नितीन वर्मा, सुनील बोरकर, सोनू पठाण, दीपक पंडोले, संजय हरसुले, मिराबाई, आशा बाई, शेख महेबुब, अजिक्य खेरडे, दिपेश खेरडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता. गाडगेनगरचे ठाणेदार के.एन. पुंडकर यांनी जिल्हा परिषद आवारात चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलन करणारचमेळघाटातील जनतेच्या आरोग्यासाठी आलेल्या ८ पीएच या लेखाशिर्षातील कोट्यवधी रूपयांच्या कामाचे तुकडे पाडल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच याची दखल घेवून युवा स्वाभिमान संघटनेने म्याऊ आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला होता. मात्र आंदोलनापूर्वी हे आंदोलन दाबण्यास जो प्रयन्न पोलिसांनी केला तरीही जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराचे कुरण उकळून फेकल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशारा उपेन बच्छले यांनी दिला आहे.