अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या आयुष्यात अनेक सकंटांना सामोरे गेले. त्यामुळेच त्यांना स्वराज्य मिळविण्यात यश आले. आज परिस्थिती बदलली असली तरी समस्या मात्र त्याच आहेत. त्यातून बाहेर येण्याचा मार्गदेखील या समस्यांमध्येच दडला आहे. तो शोधता आला तर प्रत्येकजण शिवबांप्रमाणे नवे साम्राज्य स्थापन करु शकतील. विशेषत: युवकांनी शिवाजी महाराजांप्रमाणे चारित्र्य संपन्न होऊन समाजात आदर्श निर्माण केला पाहिजे. तेव्हाच छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा या पृथ्वीवर अवतरीत झाले असे म्हणता येईल, असे विचार अकोल्याचे ख्यातिनाम प्रबोधक शिवश्री शिवाजी भोसले यांनी मांडले. स्थानीय मालटेकडी परिसरात गुरुवारी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात महापौर चरणजीत कौर नंदा, आमदार सुनील देशमुख, संजय जाधव, जिजाऊ कमर्शियल को-अप बँकेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कोठाडे, माजी खासदार अनंत गुढे, अरविंद गावंडे, चंद्रकांत मोहिते, उज्ज्वल गावंडे, हरिभाऊ लुंगे, कांचनमाला उल्हे, किर्तीमाला चौधरी, राहुल पाटील ढोक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मालटेकडीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी यावेळी त्यांच्या प्रतिमेंला माल्यार्पण केले.
युवकांनी शिवबांप्रमाणे चारित्र्यसंपन्न व्हावे
By admin | Updated: February 20, 2015 00:12 IST