शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात तरुणाचा खून; जुळ्या शहरात संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 16:29 IST

परतवाडा येथील टिंबर डेपो भागात सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास एका ३८ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. त्यानंतर परतवाड्याची बाजारपेठ तडकाफडकी बंद करण्यात आली.

ठळक मुद्देदगडफेकीत अन्य एकाचा मृत्यू

 लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : परतवाडा येथील टिंबर डेपो भागात सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास एका ३८ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. त्यानंतर परतवाड्याची बाजारपेठ तडकाफडकी बंद करण्यात आली. दरम्यान झालेल्या दगडफेक व मारहाणीत अन्य एकाचा मृत्यू झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. परिणामी अचलपूर, परतवाडा व सरमसपुरा या तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.भरदविसा गवळी समाजाच्या श्याम रघु खोलापुरे या ३८ वर्षीय तरुणावर चाकू व लाठ्याकाठ्यांनी हल्ला करण्यात आला. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी विशिष्ट समुदायातील तिघांना अटक केली. गवळी समाजातील तरुणाचा खून आणि विशिष्ट समुदायातील तिघांना झालेली अटक यातून दोन गट समोरासमोर ठाकले. बेधुंद दगडफेक करण्यात आली. काहींनी जबरदस्तीने बाजारपेठ बंद केली. त्यामुळे तणावात भर पडली. एका जमावाकडून तिघांना बेदम मारहाण करण्यात आली. पैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे अतिसंवेदनशील असलेल्या जुळ्या शहरात तणाव निर्माण झाला. स्थानिक तीनही पोलीस ठाण्यातील पोलिसांसह दंगा नियंत्रण पथक व एसआरपीएफचे प्लाटून तैनात करण्यात आले. दुपारी ३ च्या सुमारास ग्रामीण पोलीस अधीक्षक हरीबालाजी एन. यांनी परतवाडा गाठून स्थितीचे अवलोकन केले. त्यानंतर तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली. अचलपूर - परतवाडा या दोन्ही शहरात प्रचंड तणाव असून, पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली आहे. जुळ्या शहरात संचारबंदी लागू होण्याची अलीकडच्या दहा वर्षांमधील ही पहिली घटना आहे. परतवाडा व अचलपूर या दोन्ही शहरातील शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. दरम्यान दुपारी ४ च्या सुमारास पतवाडा पोलीस ठाण्यावर सुमारे सातशे ते आठशे लोकांचा जमाव चालून आला.

टॅग्स :Murderखून