लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : शहरातील डांगरीपुरा परिसरात पोळ्याच्या दिवशी ३० ऑगस्टला रात्री ८.३० च्या सुमारास दोन कुटुंबांमध्ये झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. घटनेचे गांभीर्य पाहता, शहरात दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. फळविक्री व्यवसायातील जुन्या वादातून ही घटना घडली. ऋषीकेश प्रकाश मेश्राम (२२, रा. डांगरीपुरा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी नरेंद्र मोतीराम मेश्राम यांच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी मंगेश प्रकाश कावरे (रा. डांगरीपुरा) याच्याविरुद्ध कलम ३०२, ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.तक्रारीनुसार, फिर्यादी नरेंद्र व आरोपी मंगेश यांचे फळविक्रीचे दुकान आहे. मात्र, आरोपीचे दुकान फारसे चालत नसल्याने दोघांमध्ये वितुष्ट आले होते. त्याच मुद्द्यावरून मंगेशने शिवीगाळ करीत नरेंद्र मेश्राम यांचा भाऊ ललितच्या उजव्या पायाच्या मांडीत चाकू भोसकला. भांडण सोडविण्यासाठी आलेला नरेंद्रचा चुलतभाऊ ऋषीकेश याच्या छातीवर मंगेशने चाकूने वार केले. त्याला अत्यवस्थ स्थितीत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. यादरम्यान आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. दुसरीकडे गंभीर जखमी ललितला ग्रामीण रुग्णालयातून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलीस व डॉक्टरांनी दिली.दरम्यान, शुक्रवारी रात्री मंगेशचे वडील प्रकाश कावरे यांच्यावरही काही जणांनी हल्ला झाला. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला असून, पुढील उपचाराकरिता अमरावती येथे नेण्यात आले.याप्रकरणी नरेंद्र मेश्राम यांनी रात्री १२ च्या सुमारास चांदूर रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोळ्याच्या दिवशी चांदूर रेल्वेत तरुणाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:59 IST
ऋषीकेश प्रकाश मेश्राम (२२, रा. डांगरीपुरा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी नरेंद्र मोतीराम मेश्राम यांच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी मंगेश प्रकाश कावरे (रा. डांगरीपुरा) याच्याविरुद्ध कलम ३०२, ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, फिर्यादी नरेंद्र व आरोपी मंगेश यांचे फळविक्रीचे दुकान आहे.
पोळ्याच्या दिवशी चांदूर रेल्वेत तरुणाची हत्या
ठळक मुद्देदंगा नियंत्रक पथक तैनात । फळविक्रीवरून वाद, दोघे गंभीर