शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

वडाळीच्या खोलीकरणासाठी युवक काँग्रेसचे अर्धदफन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 21:27 IST

वडाळी तलावाच्या खोलीकरणासाठी १८ व १९ मे रोजी महाश्रमदानाची संकल्पना महापालिकेने राबविली.

अमरावती : ब्रिटिशकालीन वडाळी तलावाच्या खोलीकरणात हयगय चालविल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या पदाधिका-यांनी ३१ मे रोजी अर्धदफन आंदोलन केले. यावेळी प्रकृती बिघडल्याने एका आंदोलनकर्त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत तलावाच्या खोलीकरणासाठी दोन कोटी रुपये प्रशासनाने मंजूर केले. वडाळी तलावाच्या खोलीकरणासाठी १८ व १९ मे रोजी महाश्रमदानाची संकल्पना महापालिकेने राबविली. त्यानंतर तलावाच्या खोलीकरणाकडे पाहिजे त्या प्रमाणात शहर-जिल्हा प्रशासनाने लक्षच दिले नाही. येथे किमान पाच फूट खोल गाळ काढावा लागेल. मात्र, मोठा गाजावाजा करून गाळ काढण्याकरिता लावण्यात आलेले जेसीबी आता तेथे आढळून येत नाही. याबाबत रोष व्यक्त करीत युवक काँग्रेसच्यावतीने ३१ मे रोजी तलावात अर्धदफन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार अमरावती विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नीलेश गुहे यांच्या नेतृत्वात गुरुवारी सकाळी ७.३० वाजता अर्धदफन आंदोलनाला सुरुवात झाली. तलावाच्या परिसरात पोहोचलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी स्वत:ला जमिनीत अर्धे गाडून घेतले. दुपारी ३ वाजेपर्यंत ४६ अंश तापमानातही कार्यकर्ते टिच्चून आंदोलन करीत होते. यादरम्यान नीलेश गुहे यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंदोलनात नीलेश गुहे, तन्मय मोहोड, अमित गुडदे, अभिषेक साखरे, प्रशांत यावले यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी माजी आमदार रावसाहेब शेखावत, पुरुषोत्तम मुंधडा, सूरज अडायके, गुड्डू हमीद, संकेत साहू, अमोल गुहे, पंकज गुहे, प्रमोद राऊत, अंकुश टोपले, अभी धुरजड यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. खोलीकरणासाठी दोन कोटी वडाळी तलावात आंदोलन सुरू असताना आमदार यशोमती ठाकूर व आमदार वीरेंद्र जगताप यांनी याच मुद्द्यावर विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाºयांची बैठक घेतली. याप्रसंगी आमदार सुनील देशमुख यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जिल्हाधिकाºयांना खोलीकरणासाठी दोन कोटी उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या. मागणी मान्य झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Amravatiअमरावती