शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

तीन अल्पवयीनांसह तरुणाने चोरले होते नऊ लाखांचे सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:43 IST

सिटी कोतवाली हद्दीतील व्यापारी प्रतिष्ठान फोडून ३० तोळे सोने चोरणाऱ्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शेख शकील शेख मजिद (२२, रा. सुफियाननगर) याला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून नऊ लाखांचे सोने व १० हजारांची रोकड असा एकूण ९ लाख १० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई : मुख्य आरोपीला अटक, अल्पवयीन ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सिटी कोतवाली हद्दीतील व्यापारी प्रतिष्ठान फोडून ३० तोळे सोने चोरणाऱ्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शेख शकील शेख मजिद (२२, रा. सुफियाननगर) याला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून नऊ लाखांचे सोने व १० हजारांची रोकड असा एकूण ९ लाख १० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.पोलीस सूत्रानुसार, भावेश राजेश कामदार (२३, रा. देशनानगर) यांनी ५ जून रोजी सिटी कोतवाली पोलिसांत तक्रार नोंदविली होती. त्यामध्ये त्यांच्या खत्री मार्केट येथील व्यापारी प्रतिष्ठानातून चोरांनी तीन लाखांची रोकड व १७ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण सहा लाखांचा ऐवज चोरून नेल्याचे नमूद केले होते. या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४६१, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. सूक्ष्म निरीक्षण करून गुन्ह्याच्या पद्धतीचा अभ्यास केला. या गुन्ह्यात पोलिसांना रेकॉर्डवरील तीन अल्पवयीन निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांची चौकशी करून मुख्य आरोपी शेख शकीलला अटक केली. त्याच्याजवळून चोरीतील ९ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. फिर्यादीने १७ तोळे सोने चोरी गेल्याचे आधी तक्रारीत दिले होते. मात्र, त्यांच्या दुकानातून ३० तोळे सोने चोरीचे निदर्शनास आले.यांनी लावला गुन्ह्याचा छडागुन्ह्याचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर गुन्हे शाखेने आरोपींना अटक केली. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, उपायुक्त यशवंत सोळंके, शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राम गीते, पोलीस हवालदार विकास रायबोले, अजय मिश्रा, जावेद अहमद, दिनेश नांदे, सुलतान शेख, निवृत्ती काकड व चालक अमोल बहादरपुरे यांनी गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मिळविले.मौजमस्तीसाठी चोरीतीन अल्पवयीनांनी मुख्य सूत्रधार आरोपीच्या मार्गदर्शनात व्यापारी प्रतिष्ठानात चोरी केली. चोरीतील पैशांतून मौजमस्ती करण्याचा त्यांचा उद्देश होता. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी आरोपींना गाठले.