शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आपले मतदान, लोकशाहीचा प्राण!

By admin | Updated: October 11, 2014 22:57 IST

विधानसभा निवडणुकीत अधिक मतदान होण्यासाठी तालुका प्रशासनाच्यावतीने येथे मतदार जागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी झाले होते.

मतदार जागृती रॅली : विद्यार्थ्यांचा सहभागभातकुली : विधानसभा निवडणुकीत अधिक मतदान होण्यासाठी तालुका प्रशासनाच्यावतीने येथे मतदार जागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषवाक्यांच्या गजराने सारा आसमंत दुमदुमला होता. तालुका प्रशासनाच्यावतीने येथील छोगालाल राठी गुरूकुल विद्यालयाच्या प्रांगणातून मतदार जागृती रॅली काढण्यात आली. यावेळी तहसीलदार अजितकुमार येळे, नायब तहसीलदार रवी महाले, गटशिक्षणाधिकारी जयश्री राऊत, तलाठी संतोषसिंह गील, गटसमन्वयक नरेंद्र धनस्कर, प्राचार्य अजीज रिजवी, मुख्याध्यापिका पन्ना बोरा, पोलीस पाटील रवींद्र खांडेकर, केंद्रप्रमुख हुसेनीसह आदींचा सहभाग होता.रॅलीत छोगालाल राठी गुरूकुल विद्यालय, जडावबाई राठी कन्या विद्यालय, ज्ञानेश्वर पवार कनिष्ठ महाविद्यालय, राष्ट्रीय एकता उर्दू हायस्कूल, जिल्हा परिषद मुलांची व मुलींची मराठी शाळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा, आदर्श इंग्लिश स्कूल, आदिवासी आश्रमशाळांचे दोन हजार विद्यार्थ्यांसह सर्व मुख्याध्यापक, बीएलओ, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.शहराच्या प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. दानात दान एकच दान, चला करु या मतदान, आपले मतदान लोकशाहीचा प्राण, मतदान करु देश घडवू, जागरूक नागरिक होऊ, अशा विविध घोषवाक्यांच्या गजराने आसमंत दुमदुमला होता. छोगालाल राठी गुरुकुल विद्यालयाच्या प्रांगणात या रॅलीचा समारोप झला. यावेळी तहसीलदार अजितकुमार येळे, गटशिक्षणाधिकारी जयश्री राऊत, अजीज रिजवी, सुरेश ठाकूर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत बहुसंख्येने मतदान करुन लोकशाही व्यवस्था बळकट करण्याचे आवाहन केले. (तालुका प्रतिनिधी)