आरोपीचे वडील हे नेहमी दारू पिऊन भांडत करीत असतात. अशातच १८ दिवसांपूर्वी जखमी महिलेचा पती त्यांना समजावण्यास गेला असता त्यांच्यातच भांडण झाले. यानंतर याचा राग मनात धरून आरोपी कार्तिक विलास इंगळे हा गुरुवारी जखमीच्या पतीला मारायला घरी गेला होता. परंतु ते घरी नसल्यामुळे आरोपीने पत्नी शुभांगी जयेंद्र इंगळे यांना चाकूने मारून जखमी केले. जखमी महिलेला चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले व तेथून अमरावतीला हलविण्यात आले. किशोर इंगळे यांच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपी कार्तिक इंगळे (१९)विरूध्द भादंविचे कलम ३०७, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश मुपडे करीत आहे.
तरुणाचा महिलेवर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:12 IST