शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

शेंदूरजनाघाट येथील युवकाची दगडाने ठेचून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 22:25 IST

स्थानिक पिंपळपुरा परिसरातील २७ वर्षीय युवकाचा मृतदेह मंगळवारी सकाळी वाई शिवारातील एका शेतात आढळून आला. रिसेप्शनला जात असल्याचे सांगून तो सोमवारी सायंकाळी दुचाकीने घराबाहेर पडला होता. शेंदूरजनाघाट पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.

ठळक मुद्देवाई शिवारात आढळला मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्कशेंदूरजनाघाट : स्थानिक पिंपळपुरा परिसरातील २७ वर्षीय युवकाचा मृतदेह मंगळवारी सकाळी वाई शिवारातील एका शेतात आढळून आला. रिसेप्शनला जात असल्याचे सांगून तो सोमवारी सायंकाळी दुचाकीने घराबाहेर पडला होता. शेंदूरजनाघाट पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.नीलेश वामन ठाकरे असे मृताचे नाव आहे. तो २१ मे रोजी सायंकाळच्या सुमारास रिसेप्शनला जात असल्याचे सांगून एम.एच. २७ वाय ३४५७ क्रमांकाच्या दुचाकीने घरून निघाला. रात्री उशिरा घरी न परतल्याने त्याचा शोध घेतला असता, मंगळवारी सकाळी वाई शिवारातील वरूडकर यांच्या शेतात मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती शेंदूरजनाघाट पोलिसांना मिळाल्यावरून ठाणेदार शेषराव नितनवरे, उपनिरीक्षक कनाटे, जमादार लक्ष्मण साने, कॉन्स्टेबल पंकज गावंडे, अतुल मस्के, प्रशांत गिरडकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. चेहरा दगडाने ठेचून आणि कमरेच्या बेल्टने गळा आवळून हत्या केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय वरूड येथे पाठविण्यात आला.मृतासोबत दुचाकीवर कोण होते, याबाबत शेंदूरजनाघाट पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलदार तडवी यांनी घटनास्थळाला भेट दिली.