शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

योगेशच्या मृत्यूला कारणीभूत ठरली 'खुन्नस'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 23:05 IST

महाजनपुरा,माताखिडकी परिसरातील तरुणांमध्ये झालेल्या पूर्वीच्या वादातील खुन्नस योगेशच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. दोन तरुणांच्या गटातील तिरस्काराची भावना नेहमीच वादातीत राहिल्यामुळे या तरुणांच्या वर्चस्वाच्या लढाईत योगेशचा बळी गेल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.

ठळक मुद्देदोन गटांमध्ये तिरस्काराची भावना : खोलापुरी गेट हद्दीत वर्चस्वाची लढाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाजनपुरा,माताखिडकी परिसरातील तरुणांमध्ये झालेल्या पूर्वीच्या वादातील खुन्नस योगेशच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. दोन तरुणांच्या गटातील तिरस्काराची भावना नेहमीच वादातीत राहिल्यामुळे या तरुणांच्या वर्चस्वाच्या लढाईत योगेशचा बळी गेल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.खोलापुरी गेट हद्दीतील महाजनपुरा, माताखिडकी, वल्लभनगर, गांधी आश्रम परिसरात नेहमीच गुन्हेगारी घटना घडतात. यामध्ये संवेदनशील परिसर म्हणून गणल्या जाणाऱ्या माताखिडकी व महाजनपुºयातील दोन गटांतील तरुणांचे अनेकदा वाद उफाळून आले आहेत. या वादातून एकमेकांवर प्राणघातक हल्लेसुद्धा झाले आहेत. अनेक वर्षांपासून दोन्ही परिसरातील काही तरुणांचे वेगवेगळे गट एकमेकांची खुन्नस वाढवित आहेत. समोरासमोर आल्याने त्यांच्यात अनेकदा भांडणे झालीत. परिसरातील काही सामान्य तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांच्या संपर्कात राहतात. त्यामुळे साधारण तरुणसुद्धा गुन्हेगारीच्या कचाट्यात भरडला जात आहे. योगेशचाही अशाच गटबाजीच्या वादात बळी गेल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. साधारण परिस्थितीत राहणारा योगेश मिळेल ते काम करायचा. बहुधा तो रंगकामात व्यस्त असायचा. मात्र गुन्हेगारीशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या योगेशला नाहक जीव गमवावा लागला. गुन्हेगारांसोबत योगेशचा संपर्क आल्यानेच दुसºया गटातील काही तरुणांमध्ये त्याच्याबद्दल खुन्नस वाढली होती. तो आपल्यावर वर्चस्व गाजवू शकेल याच भावनेतून माताखिडकीतील त्या आरोपी तरुणांनी त्याला एकट्यात गाठून संपविले असावे, असे प्राथमिक चौकशीत पोलिसांच्या निदर्शनास आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मुशीर आलम हत्याकांडातील आरोपींशी योगेशचा संबंधसाबणपुरा येथे घडलेल्या मुशिर आलम हत्याकांडातील आरोपींचा योगेश मित्र होता. सद्यस्थितीत मुशिर आलम हत्याकांतील आठवले बंधू कारागृहात आहे. मात्र या आरोपींची काही मित्रमंडळी बाहेर आहे. योगेश हा आठवले गँगचा सदस्य असल्याचाही हा जुना वाद असल्याची चर्चा परिसरात आहे.जखमी अवस्थेत आणून टाकले कुणी?चाकूच्या हल्ल्यानंतर जीव वाचविण्यासाठी योगेश रक्तबंबाळ अवस्थेत धावत सुटला. सराफा बाजार चौकात पडतझडत तो पुन्हा उठला आणि त्याने महाजनपुºयातील घर गाठले. त्यानंतर तो खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर गंभीर अवस्थेत पडलेला आढळला. त्याला कुणीतरी पोलीस ठाण्यात सोडून पलायन केल्याचे निदर्शनास आले. ती व्यक्ती कोण, याचाही शोध पोलीस घेत आहे.खोलापुरी गेट हद्दीत गँगवारखोलापुरी गेट हद्दीतील काही परिसरात गँगवार पेटले आहे. यापूर्वीही अनेक टोळक्यांमधील वाद उफाळून आले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांमध्ये अधूनमधून वाद होतात. माताखीडकी, महाजनपुरा, गांधी आश्रम, वल्लभनगर आदी परिसरात अवैध व्यावसायिकांचे प्रमाण अधिक असून, त्यातूनच गुन्हे घडत आहेत. मात्र, या गुन्हेगारीवर पोलिसांचे अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. या हत्येमागेही अवैध व्यवसायाचे मूळ असल्याची चर्चा असून, पोलिसांनाही संशय बळावला आहे.