निवडणूक : राजकीय मंडळीचे लागले लक्ष
अमरावती : जिल्ह्यात सध्या ८४० पैकी ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे . जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत येवदा येथे मोठी चुरस पाहायला मिळणार आहे, तर सर्वात छोटी ग्रामपंचायत चांदूर बाजार तालुक्यातील वडुरा येथे सदस्यांची अविराेध निवड झाली आहे.
कोरोनामुळे रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकाना नव्या वर्षाचा मुहूर्त मिळाला आहे.ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर झाल्याने अनेक इच्छुकांनी तयारी केली आहे. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने इच्छुकांची धाकधूकही वाढली आहे .जिल्ह्यात अनेक मोठ्या ग्रामपंचायती आहेत. या ठिकाणी चुरशीची निवडणूक पाहायला मिळणार आहे. यंदा सर्वात लहान ग्रामपंचायतीची वाटचाल नेहमीप्रमाणेच चुरशीची न होता अविरोध झाली आहे. येथे तीन गटांनी एकत्र येत ग्रामपंचायत अविरोध केली आहे. तर दुसरीकडे येवदा येथे काँग्रेस, राष्ट्रवादी व त्यानंतर प्रहार अशा तीन पक्षांच्या समर्थकांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. परिणामी यावेळी या ठिकाणीच लढतही लक्षवेधी होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी राजकीय डावपेचात विविध पक्षांचे लक्ष लागले आहे. अनेक दिग्गज नेते मंडळी या ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष ठेवून असतात. त्यामुळे या ग्रामपंचायतीकडे दर्यापूर तालुक्यातील राजकीय मंडळींचे लक्ष लागले आहे.
बॉक्स
सर्वांत मोठी ग्रामपंचायत
येवदा
एकूण सदस्य संख्या १७
एकूण मतदार ९४८७
पुरुष मतदार ४८९४
महिला मतदार ४५९३
बॉस
सर्वांत लहान ग्रामपंचायत वडुरा
सदस्य संख्या ७
एकूण मतदार १२५८
पुरुष मतदार ६३५
महिला मतदार ६२३