शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
3
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
5
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
6
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
7
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
8
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
9
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
10
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
11
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
12
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
13
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
14
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
15
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
16
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
17
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
18
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
19
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
20
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट

समाजकल्याण वसतिगृहातील प्रवेश यंदा आॅफलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2016 00:15 IST

सामाजिक न्याय (समाज कल्याण) विभागाच्या शासकीय वसतिगृहातील प्रवेश यंदा आॅफलाईन होणार आहेत.

अमरावती : सामाजिक न्याय (समाज कल्याण) विभागाच्या शासकीय वसतिगृहातील प्रवेश यंदा आॅफलाईन होणार आहेत. मागील वर्षी हे प्रवेश आॅनलाईन केले होते. त्यात बराच वेळ खर्ची पडल्याने यंदा आॅफलाईन प्रवेश घेण्याचे आदेश समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. त्यामुळे समाजकल्याण आयुक्तांच्या सूचनेनुसार १ ते ३० जून या काळात ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अपंग, अनाथ व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांतील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणे सोयीचे व्हावे यासाठी विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे समाजकल्याण विभागाने सुरू केली आहेत. विभाग पातळीवर एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहासह जिल्हा व तालुका ठिकाणी शंभर ते अडीचशे विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृहे आहेत. वसतिगृहात गुणवत्तेनुसार प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास व्यवस्था, भोजन, शैक्षणिक, साहित्य व निर्वाह भत्ता आदी सुविधा मोफत देण्यात येतात. पूर्वी या वसतिगृहात आॅफलाईन प्रवेश देण्यात येत होते. वसतिगृहात व सहायक आयुक्त कार्यालयात अर्ज घेऊन गुणवत्ता यादी तयार करण्यात येत होती. काही ठिकाणी यात गोंधळ झाल्याने व प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने मागील वर्षी ही प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन केली. यात विद्यार्थ्यांकडून आॅनलाईन अर्ज भरून घेऊन राज्यस्तरावरून जिल्हानिहाय गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश देण्यात आले. आॅनलाईन प्रक्रियेतील गुंतागुंत व अन्य कारणांमुळे मागील वर्षी या प्रवेशाला खूप वेळ लागला. विशेष म्हणून प्रवेशाचे अधिकार समाजकल्याण मंत्र्यांकडे असल्याने काही पालकांची अडचण झाली. त्यामुळे यंदा आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया न घेता पूर्वीप्रमाणेच आॅफलाईन प्रक्रिया घेण्याचे आदेश बगेले यांनी दिले आहेत. दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना तसेच १ लाख रुपये उत्पन्न असलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे.