कपाशीला पर्याय : मूग, उडदाचेही क्षेत्र होणार रुपांतरितअमरावती : यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ७ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यापैकी ५ लाख ४६ हजार ४४७ हेक्टर क्षेत्रात ९ जुलै अखेर पेरणी झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक २ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे आहे. हे क्षेत्र कपाशी पेक्षा १ लाख २ हजार ६०१ हेक्टरने जास्त आहे. पावसाच्याव प्रदीर्घ खंडामुळे मूग, उडीदाचेही क्षेत्र सोयाबीनमध्ये रुपांतरित होत असल्याने सोयाबीनचे क्षेत्र सरासरीपेक्षा अधिक वाढणार आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे २ लाख ९३ हजार ३०० हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी ८९ टक्के क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झालेली आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ८ हजार ७५० हेक्टर, चिखलदरा ११ हजार ८१० हेक्टर, अमरावती ३१ हजार २१० हेक्टर, भातकुली २९ हजार ७०८ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ३८ हजार ३३० हेक्टर, चांदूररेल्वे १९ हजार हेक्टर, तिवसा २२ हजार ८८६ हेक्टर, मोर्शी १९ हजार २१२ हेक्टर, वरुड ८५० हेक्टर, दर्यापूर १४ हजार ७७२ हेक्टर, अंजनगाव सूर्जी १३ हजार ४२४ हेक्टर, अचलपूर १० हजार ४०९ हेक्टर, चांदूरबाजार १७ हजार ३२३ हेक्टर, धामणगाव रेल्वे २२ हजार ७१७ हेक्टर अशा एकूण २ लाख ६० हजार ४०१ हेक्टरवर पेरणी झाली. खरीप हंगामात पेरणीच्या पहिल्या टप्प्यात सोयाबीनपेक्षा कपाशी वाणाची अधिक पेरणी झाली होती. मात्र नंतर सोयाबीन पेरणीचा वेग वाढला. सद्यस्थितीत कपाशीपेक्षा सोयाबीन १ लाख हेक्टरने अधिक क्षेत्र आहे. जिल्ह्यात कपाशीचे १ लाख ५७ हजार ७० हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये धारणी तालुक्यात ६ हजार २१०, चिखलदरा ५४४ हेक्टर, अमरावती ७ हजार ५४२ हेक्टर, भातकुली ५ हजार १७८ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ४ हजार ११७ हेक्टर, चांदूररेल्वे ४ हजार ६३३ हेक्टर, वरुड २६ हजार हेक्टर, दर्यापूर १८ हजार ५८९ हेक्टर, अंजनगाव १० हजार ६१ हेक्टर, अचलपूर १३ हजार ५२० हेक्टर, चांदूरबाजार १४ हजार ९२७ हेक्टर व धामणगाव रेल्वे तालुक्यात १८ हजार ७५६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. (प्रतिनिधी)सोयाबीनच्या क्षेत्रात होणार वाढ यावर्षीच्या हंगामात पावसात प्रदीर्घ खंड आहे. १७ दिवसांपासून पाऊ स बेपत्ता आहे. आणखी ५ ते ७ दिवस दमदार पावसाची शक्यता नाही. त्यामुळे ६० दिवस अल्पकालावधीचे मूग व उडीद पिके बाद होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र कपाशीमध्ये रुपांतरित होत असल्याने सोयाबीनची पेरणी सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात होणार असल्याची माहिती आहे. वरुड तालुक्यात सर्वात कमी सोयाबीन पीकसद्यस्थितीत वरुड तालुक्यात फक्त ८५० हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झाली आहे. मात्र जिल्ह्यात सर्वाधिक कपाशीची पेरणी वरुड तालुक्यात २६ हजार हेक्टरमध्ये झाली आहे. तर सोयाबीनची सर्वाधिक पेरणी नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३८ हजार ३३० हेक्टरमध्ये झाली आहे.
यंदा सोयाबीनची सर्वाधिक पेरणी
By admin | Updated: July 12, 2015 00:22 IST