शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

यंदा शेती ठेका-बटईने देण्याकडे अनेकांचा कल

By admin | Updated: March 11, 2015 00:32 IST

मागील दोन, तीन वर्षांपासून नापिकीचे सत्र सुरूच आहे. अर्धाही उत्पादन खर्च निघत नसल्याची स्थिती आहे. निव्वळ शेतीवर विसंबून राहणे अशक्यप्राय आहे.

लोकमत विशेषअमरावती : मागील दोन, तीन वर्षांपासून नापिकीचे सत्र सुरूच आहे. अर्धाही उत्पादन खर्च निघत नसल्याची स्थिती आहे. निव्वळ शेतीवर विसंबून राहणे अशक्यप्राय आहे. पुढील हंगामात पेरणी कशी करावी ही समस्या शेतकऱ्यांसमोर आहे. अशा स्थितीत अनेक शेतकऱ्यांनी बैल-बारदाना मोडीत काढला आहे. यंदा पैशाच्या स्वरुपात किंवा भागिदारीत शेती देण्याकडे कल दिसून येत आहे.जिल्ह्यात पेरणीयोग्य १० लाख हेक्टर क्षेत्र आहे. संरक्षित सिंचनाची सोय असलेले १० टक्के क्षेत्र वगळता उर्वरित ९० टक्के क्षेत्र पावसावर अवलंबून असते. मागील वर्षी सरासरीपेक्षा ४० टक्के अधिक पावसामुळे खरीप हंगाम गारद झाला. सर्वाधिक पेरणी क्षेत्र असणारे सोयाबीन खराब झाले. परतीच्या पावसामुळे व जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात आलेल्या गारपिटीमुळे सर्वच पिके बाधित झालीत. परिणामी उत्पादन खर्चदेखील निघाला नाही.यंदाच्या खरीप हंगामात पेरणीपासून दीड महिना पावसाने दडी मारली. त्यामुळे आॅगस्ट अखेरपर्यंत खरिपाची पेरणी सुरू होती. नंतर पावसात खंड यामुळे सोयाबीनची क्विंटलऐवजी किलोची झडती आली. काही शेतातील सोयाबीन शेतातच सडले. सोयाबीनच्या उत्पन्नात ६० ते ७५ टक्क्यांपर्यंत घट झाली. उत्पादन खर्च निघणे दूरच, पेरणी खर्चदेखील निघू शकला नाही. सततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आर्थिक संकटात सापडला आहे. शेती पिकाची अवस्था काहीही असो घरगड्यांचा वार्षिक पगार हा लाखांच्या घरात पोहोचला आहे. मजुरीचे दर वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांनी बैलजोडी विकून भाड्याने किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करणे सुरू केले आहे. (प्रतिनिधी)सालकरी पोहोचला  एक लाखावरअक्षयतृतीयेनंतर सालकरी ठेवण्याची प्रथा आहे. जिल्ह्यात सालकऱ्याचे ७० ते ७५ हजार रूपये वर्ष असे करार असतात. याव्यतिरिक्त दिवाळी, पोळ्याला ड्रेस, धान्य हे वेगळेच आहे. हल्ली संपर्कासाठी मोबाईल देखील द्यावा लागतो. त्यामुळे हा सालकरी आता लाखावर पोहचला आहे. उत्पन्न कमी होत असल्याने अनेक मोठ्या खटल्यातून सालकरी बाद होऊन रोजंदारीवर कामे करीत आहेत. शेतीच्या प्रतवारीवर ठरतो भावशेती पैशाने, मक्त्याने किंवा भागिदारीत लावायची असल्यास त्या शेताची प्रतवारी पाहून भाव ठरतो. साधारणपणे जिल्ह्यात १० ते २५ हजार रूपये एकर असे भाव आहे. भागिदारीत दिली असल्यास प्रत्येक खर्च हा अर्धा विभागला जातो. एक हंगाम किंवा दोन्ही हंगामासाठी शेती दिली जाते. १८ हजारांनी घटली बैलांची संख्याजिल्ह्यात २०१२ मध्ये १९ वी पशुगणना करण्यात आली. यामध्ये २००७ मध्ये झालेल्या पशुगणनेच्या तुलनेत बैलांची संख्या १८ हजारांनी कमी झाली आहे. यांत्रिककरण व नापिकीमुळे दोन वर्षांत ५ हजार बैलांची संख्या कमी झाली आहे.