२८ हजार हेक्टरमध्ये यंत्राने पेरणी : अल्प पावसावर करणार मातमोहन राऊत अमरावती दरवर्षी सोयाबीन पेरणीची तीच पारंपरिक पद्धत, उत्पादनात होणारी घट अशा विविध कारणांमुळे कृषी विभागाने ५० टक्के अनुदानावर यंदा बीबीएफ यंत्राचे तब्बल दोन वर्षांत ३०० बचतगटांना वाटप केले असल्यामुळे २८ हजार हेक्टर मध्ये या यंत्राद्वारे पेरणी करण्यात येणार आहे़ सोयाबीन बियाण्याची टंचाई व आगामी काळात पडणारा कमी पाऊस हा शेतकऱ्यांसाठी या यंत्राद्वारे पेरणी होणार असल्याने वरदान ठरणार आहे़पाच वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी यांत्रिकी शेती पद्धतीवर अधिक भर देत आहे़ कृषी विभागाच्या वतीने यंदा विदर्भ प्रवाही सघन सिंचन विकास कार्यक्रम अंतर्गत मागील तीन वर्षांत जिल्ह्यातील तीनशे बचत गटांना बीबीएफ म्हणजे रूंद सरी वरंबा यंत्र अनुदानावर देण्यात आले आहे़ या यंत्राद्वारे पेरणी केल्यास वीस टक्के बियाणे बचत होऊन उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होणार असल्याचा अंदाज अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने वर्तवीला आहे़ जून महिन्याच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतर सोयाबीन पेरणी रूंदसरी वरंबा पद्धती केल्यास बियाण्याची बचत होते़ सोयाबीन, तूर, ज्वारी, या धान्याची पेरणी अधिक सुलभ पध्दतीने करता येते. बाजारात हे यंत्र ४७ हजार रूपये किंमतीचे असले तरी कृषी विभागाने मागील एक वर्षात जिल्ह्यातील चाळीस शेतकऱ्यांचा असलेल्या प्रत्येकी एका बचत गटाला ५०टकके अनुदानावर हे यंत्र उपलब्ध करून दिले आहे़ आतापासून शेतकऱ्यांनी या यंत्राला पसंती दाखविली आहे़ त्यामुळे भविष्यात नवतंत्रज्ञानाची जोड शेतीला मिळेल.
बीबीएफ यंत्र ठरणार शेतकऱ्यांना यंदा वरदान
By admin | Updated: May 13, 2016 00:08 IST