शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

यंदा १ लाख ३२ हजार मे. टन खतांची गरज

By admin | Updated: May 3, 2016 00:18 IST

यंदाचा खरीप हंगाम महिन्यावर आला आहे. सर्वच विभागाद्वारा खरिपाचे नियोजन सुरू आहे.

खरीप २०१६ : गतवर्षीचा ४०,२८५ मे. टन साठाही उपलब्धअमरावती : यंदाचा खरीप हंगाम महिन्यावर आला आहे. सर्वच विभागाद्वारा खरिपाचे नियोजन सुरू आहे. खरिपासाठी बियाण्यासोबत रासायनिक खतांचीही वाढती मागणी आहे. यंदाच्या हंगामासाठी १ लाख ३२ हजार मे. टन खतांची गरज आहे. सर्वाधिक ३८ हजार ७०० मे टन संयुक्त खतांची मागणी आहे. तसेच गतवर्षीच्या ४० हजार २८५ मे. टन खतांचा साठादेखील यंदा उपलब्ध असल्यामुळे खतांची चणचण भासणार नाही. मागील वर्षीच्या खरीप हंगामात १ लाख ११ हजार ३५३ मे. टन खताचा वापर झाला होता. खरीप २०१६ मध्ये १ लाख ४३ हजार ५०० मे. टन खतांची मागणी होती. तसेच याच हंगामासाठी १ लाख ३२ हजार ००० यापैकी ३८ हजार ७३० मे. टन खते शिल्लक आहेत. तसेच खरीप २०१६ मध्ये प्राप्त १ हजार ५५५ मे. टन खते प्राप्त झाले होते असा एकूण ४० हजार २८५ मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ६ हजार ३७१ मे. टन युरिया, १० हजार ३६५ मे. टन एस. एस. पी., ६ हजार ८०८ मे. टन डी. ए. पी., २ हजार ८८२ एमओपी, १० हजार १९ मे. टन संयुक्त खते, ३ हजार ७८९ मिश्र खते व इतर असे ५१ मे. टन खते उपलब्ध आहे. खरीप २०१६-१७ हंगामाकरिता अमरावती तालुक्यात १० हजार ५६० मे. टन ग्रेडनिहाय खते उपलब्ध आहे. भातकुली तालुक्यात ७ हजार २६० मे. टन, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ५ हजार ९४० मे. टन, चांदूररेल्वे तालुक्यात ६ हजार ६०० मे. टन, धामणगाव तालुक्यात ८ हजार ५८० मे. टन, तिवसा तालुक्यात ९ हजार २४० मे. टन, मोर्शी तालुक्यात १३ हजार २०० मे. टन, वरूड तालुक्यात १५ हजार ८४० मे. टन, चांदूरबाजार तालुक्यात ९ हजार ९०० मे. टन, अचलपूर तालुक्यात १३ हजार ८६० मे. टन, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ११ हजार २२० मे. टन, दर्यापूर तालुक्यात ११ हजार ८८० मे. टन, धारणी तालुक्यात ६ हजार ६०० मे. टन व चिखलदरा तालुक्यात १ हजार ३२० मे. टन ग्रेडनिहाय रासायनिक खते मंजूर आहेत. (प्रतिनिधी)संयुक्त खताला सर्वाधिक मागणीजिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात १ लाख ३२ हजार ग्रेडनिहाय रासायनिक खते मंजूर आहेत. यामध्ये सर्वाधिक ३८ हजार ७०० मे. टन संयुक्त खताचा साठा मंजूर आहे. युरीया ३५ हजार ६०० मे. टन, डीएपी १८ हजार ६०० मे. टन, एमओपी ८ हजार ९०० व एसएसपी ३० हजार २०० मे. टन खतांचा साठा मंजूर आहे. रबी २०१६ चा ३८,७३० मे. टन साठा शिल्लकसद्यस्थितीत जिल्ह्यात गतवर्षीचा ३८ हजार ७३० मे. टन खतांचा साठा शिल्लक आहे. यामध्ये युरीया ५ हजार ८७१ मे. टन, एसएसपी ९ हजार ९१५ मे. टन, डिएपी ६ हजार ७५८ मे. टन एमओपी २ हजार ८०२ मे. टन, संयुक्त खते ९ हजार ५६९ मिश्र खते, ३ हजार ७६९ मे. टन व ईतर ४६ मे. टन खते शिल्लक आहेत.