शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

यवतमाळला सर्वेक्षणाचे आदेश, अमरावतीला ठेंगा

By admin | Updated: September 14, 2016 00:10 IST

३५ दिवसांपासून पावसाची दडी असल्याने जिल्ह्यातील ५ लाख एकरांतील सोयाबीन पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

उफराटा न्याय : ५ लक्ष एकरांतील सोयाबीन उद्ध्वस्तअमरावती : ३५ दिवसांपासून पावसाची दडी असल्याने जिल्ह्यातील ५ लाख एकरांतील सोयाबीन पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अशीच स्थिती यवतमाळ जिल्ह्यातील आहे. तेथे पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला सोयाबीनच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळू शकतो. जिल्ह्यातील सोयाबीनची तीच गत असताना जिल्हा प्रशासनाद्वारा कुठलीही हालचाल नसल्याने सोयाबीन उत्पादक कमालीचे संतप्त झाले आहेत. पेरणीनंतर सुरूवातीच्या काळात जिल्ह्यात समाधानकारक व पोषक पाऊस पडल्यामुळे सोयाबीन बहरावर आले. नंतरच्या काळात सोयाबीनला पावसाची आवश्यकता असते. मात्र, ७ आॅगस्टपासून जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे पीक करपू लागले आहे. शेंगांमधील दाणा बारीक होऊन शेंगा पोचट होऊ लागल्या आहेत. हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीतील सोयाबीन करपू लागले आहे. दोन वर्षांपासून पावसाअभावी सोयाबीनची जी गत झाली तिच गत यंदाच्या खरीप हंगामात होत आहे. जिल्ह्यात यंदा २ लाख ८९ हजार २१२ हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झाली. यामध्ये जून महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली तेथील व उच्चप्रतीच्या जमिनीतील सोयाबीनची स्थिती बरी आहे. सोयाबीनची स्थिती वाईटअमरावती : मात्र, हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीतील सोयाबीनची स्थिती मात्र वाईट आहे. जिल्ह्यात यंदा अंजनगाव सुर्जी तालुक्यात १५ हजार ४२० हेक्टर, अचलपूर १४ हजार ३०, चांदूरबाजार १६ हजार २००, धामणगाव १८ हजार २३, चांदूररेल्वे २७ हजार ३३५, तिवसा २२ हजार ९१४, मोर्शी १९ हजार ५७७, वरुड २ हजार ८०, दर्यापूर १४ हजार २४३, धारणी ९ हजार ९३०, चिखलदरा ११ हजार ५४३, अमरावती ३८ हजार ९६०, भातकुली २२ हजार ६७९ व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ५० हजार २७८ हेक्टर इतके सोयाबीन क्षेत्र आहे. मात्र, पावसाअभावी यंदा देखील सोयाबीन हातचे जाणार, अशी स्थिती असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. सलग तिसऱ्या वर्षी घात दोन वर्षांपासून पावसाअभावी सोयाबीन करपत आहे. शेंगा भरत नाहीत. यामुळे सरासरी उत्पन्नात ५० ते ७० टक्के घट आली. यंदा देखील ३५ दिवसांपासून पावसाचा खंड असल्यामुळे सोयाबीनची तिच गत झाली आहे. सोयाबीन करपले आहे. मध्यम व हलक्या प्रतीच्या जमिनीतील सोयाबीन आताच उद्धवस्त झाले आहे. या दोन दिवसांत पाऊस न पडल्यास संरक्षित सिंचनाचे क्षेत्र वगळता सर्वत्र हीच स्थिती राहणार आहे. मध्यम व हलक्या स्वरूपाच्या जमिनीतील सोयाबीन पावसाअभावी करपले, ही वस्तुस्थिती आहे.मात्र, सर्वेक्षणाचे आदेश नाहीत. यासंदर्भात बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. - दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी