शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

२७६४ रक्तजल नमुने तपासणीसाठी यवतमाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 21:54 IST

आतापर्यंत महापालिका, जिल्हा परिषद ग्रामीण यंत्रणा व नगर परिषद क्षेत्रातील एकूण २७६४ डेंग्यूरुग्णांचे रक्तजल नमुने शासकीय यंत्रणेने घेऊन ते तपासणीसाठी यवतमाळच्या शासकीय सेंटिनल सेंटरला पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाने ‘लोकमत’ला दिली आहे. यातील ७५ टक्के रक्तजल नमुने एकट्या अमरावती महापालिका क्षेत्रातील आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आतापर्यंत महापालिका, जिल्हा परिषद ग्रामीण यंत्रणा व नगर परिषद क्षेत्रातील एकूण २७६४ डेंग्यूरुग्णांचे रक्तजल नमुने शासकीय यंत्रणेने घेऊन ते तपासणीसाठी यवतमाळच्या शासकीय सेंटिनल सेंटरला पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाने ‘लोकमत’ला दिली आहे. यातील ७५ टक्के रक्तजल नमुने एकट्या अमरावती महापालिका क्षेत्रातील आहेत.अमरावती जिल्ह्यात एकूण २२६ डेंग्यूरुग्ण असल्याचा अहवाल हा यवतमाळ सेंटिनल सेंटरने दिला होता. त्यापैकी महापालिका क्षेत्रात १९० रुग्ण आढळून आले होते. शहरातील अनेक नामांकित खासगी डॉक्टरांकडे हजारोे एनएस-वन पॉझिटिव्ह व इलायझा कन्फर्म रुग्णांची नोंद आहेत. पण, जोपर्यंत यवतमाळवरून रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह येत नाही, तोपर्यंत शासकीय यंत्रणा पॉझिटिव्ह रुग्ण मानायला तयार नाही. पण, २२६ रुग्ण पॉझिटिव्ह असणेसुद्धा मोठी बाब आहे. त्याचप्रमाणे २७६४ रक्तजल नमुने पाठविल्याचा अर्थ, डॉक्टरांकडून शासकीय आरोग्य यंत्रणेने सदर रक्तजल नमुने कलेक्ट केले, त्या रुग्णांवर सदर खासगी हॉस्पिटलमध्ये डेंग्यूचा उपचार झाला आहे. मात्र, पहिल्या पाच दिवसांत डेंग्यूसाठी उपयुक्त असलेली एनएस-वन चाचणी किट यवतमाळला अद्यापही उपलब्ध न झाल्याने या ठिकाणी फक्त आयजीएम, आयजीजी टेस्ट करण्यात येते. ही चाचणी आठ दिवसानंतर करावयाची असते. त्या कारणाने डेंग्यू पॉझिटिव्ह असतानाही अहवाल निगेटिव्ह आला आहे, अन्यथा यवतमाळ सेंटिनल सेंटरचा अहवाल हा दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा आतापर्यंत असता, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या रक्तजल नमुन्यांमध्ये महापालिका क्षेत्रातील २२१३, तर ग्रामीण भागातील ५५१ आहेत. त्या कारणाने शासकीय आरोग्य यंत्रणेने विशेषत: महापालिकेने प्रतिबंधक उपाय राबविणे गरजेचे झाले आहे.स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण पॉझिटिव्हस्वाईन फ्लू या जीवघेण्या आजाराने अमरावती शहरातही पाय पसरविले असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात आतापर्यंत २७ संशयित रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी दोन रुग्णांचे स्वॅब नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील १८ वर्षीय तरुणी व ४३ वर्षीय व्यक्तीचा सहभाग आहे. दोन्ही रुग्णांवर टॅमी फ्लूू गोळ्यांचा उपचार करण्यात आला असून, दोघांचीही प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.