शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

यशोमती ठाकूर यांचा महावितरण कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:41 IST

तिवसा विधानसभा मतदारसंघातील महावितरणच्या वेळकाढू धोरणाचा शेतकऱ्यांसह नागरिकांना फटका सहन करावा लागत होता. त्यामुळे विजेच्या विविध मुद्यावर सोमवारी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या दिला.

ठळक मुद्देसर्व मागण्या लेखी स्वरुपात मंजूर : अधिकाऱ्यांचे नमते

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तिवसा विधानसभा मतदारसंघातील महावितरणच्या वेळकाढू धोरणाचा शेतकऱ्यांसह नागरिकांना फटका सहन करावा लागत होता. त्यामुळे विजेच्या विविध मुद्यावर सोमवारी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या दिला.भारनियमानामुळे मोझरी, गुरूदेव नगर व तिवसा येथील पाणीपुरवठा खंडीत आहे. नागरिकांना याचा फटका बसत आहे. २३ आॅक्टोबरपासून गुरूकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव सुरू होईल. त्यामुळे येथील भारनियमन कमी करावे. आसेगाव, माहुली, शिराळा येथील वीज उपकेंद्रातील रोहित्राच्या क्षमतेत वाढ करावी, कृषी पंपाच्या वीज वाहिनीचा लोड कमी करावा, अशा विविध वीजेच्या प्रश्नावर महावितण विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतरही त्याची दखल न घेतल्याने २२ आॅक्टोबर रोजी आमदार यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत अधीक्षक अभियंताना याचा जाब विचारत ठिय्या दिला. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी व काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेतकऱ्यांसहन नागरिकांच्या जिव्हाळयाच्या प्रश्नांना न्याय दिल्याशिवाय येथून न हटण्याचा प्रवित्रा आ. ठाकूर व सहभागी आंदोलकांनी घेतला. अखेत महावितरणच्या अधिकाºयांनी नमते घेत महावितरणच्या मुख्य अभियंता श्रीमती गुजर, अधीक्षक अभियंता सुहास मेत्रे, कार्यकारी अभियंता ढोके, तिवसा येथील उपअभियंता तायडे आदींनी सर्व मागण्या लेखी स्वरूपात मंजूर केल्यात. या आंदोलनात झेडपी सभापती जयंत देशमुख, मुकदर खॉ पठाण, वैभव वानखडे आदी काँग्रेस पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागेआमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलनातील मागण्यांबाबत लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यामध्ये आसेगाव व शिराळा येथील उपकेंद्रात ३.१५ ट्रान्सफार्मरऐवजी ५ मेगाव्हॅट क्षमतेचे रोहीत्र ३१ आॅक्टोबरपर्यंत बसविणार, माहूल उपक्रेदात ५ मेगाव्हॅट ऐवजी १० मॅगाव्हॅट क्षमतेचे रोहीत्र येत्या २६ आॅक्टोबरपर्यंत बसविले जाईल, यासोबतच देवरा, देवरी कृषी वाहिनीचे दोन भाग केले जाणार आहेत. तालुक्यात रोहीत्र दुरूस्तीचे साहीत्य पुरविण्याचे लेखी आश्वासन अधीक्षक अभियंत्यांनी दिले.कार्यकारी अभियंत्यांच्या दालनाला ठोकले कुलूपमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या नाकार्तेपणामुळे शेतकऱ्यांच्या विविध समस्या, कृषिपंपाना वीजजोडणी, गुरूदेव नगर, तिवसा येथील पाणीपुरवठा व भारनियमनाच्या मुद्यावर तिवसा विधानसभा युवक काँग्रेसने आक्रमक होत महावितरणचे कार्यकारी अभियंता देवहाते यांच्या दालनाला कुलूप ठोकून संताप व्यक्त केला. या आंदोलनात नगरपंचायत अध्यक्ष वैभव वानखडे, रितेश पांडव, लुकेश केने, अंकुश जुनघरे, सौरभ किरकटे, उमेश महिंगे, अंकुश बनसोड, विशाल पवार, अतुल यावलीकर आदींचा समावेश होता.