शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

यशोमती यांनी सुनावले खडे बोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:37 IST

अजय लहानेंसारखा अधिकारी गरिबांच्या डोळ्यांत अश्रू आणतो त्यावेळी गरीब जनतेच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी प्रशासन अधिकाऱ्यासाठी एकत्र येतात. गरिबांना, अडल्या-नडल्यांना अद्वातद्वा बोलणाऱ्या अजय लहाने यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आम्हासारख्यांविरुद्ध तुम्ही निवेदने देता; पण याद राखा, आम्ही गरिबांचा अपमान मुळीच सहन करून घेणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अजय लहानेंसारखा अधिकारी गरिबांच्या डोळ्यांत अश्रू आणतो त्यावेळी गरीब जनतेच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी प्रशासन अधिकाऱ्यासाठी एकत्र येतात. गरिबांना, अडल्या-नडल्यांना अद्वातद्वा बोलणाऱ्या अजय लहाने यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आम्हासारख्यांविरुद्ध तुम्ही निवेदने देता; पण याद राखा, आम्ही गरिबांचा अपमान मुळीच सहन करून घेणार नाही. एकाही व्यक्तीवर अन्याय झाला तरी लढवय्या बाण्याने आम्ही उभे ठाकणारच, असे खडे बोल आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांना सुनावले.लहाने हे पुनर्वसन अधिकारी असेपर्यंत पुनर्वसनाचे मुद्दे निकाली निघूच शकत नाहीत. अपमान करणारी, तुच्छ लेखणारी, दुष्ट वागणूक ते सामान्यजनांना देतात, अशा शब्दांत ठाकूर यांनी संताप व्यक्त केला. गुरुवारी आदिवासी बांधवाच्या पुनर्वसनाची बैठक सुरू असताना आ. यशोमती ठाकूर तेथे पोहोचल्या, त्यावेळी पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला.आदिवासी विकास परिषदेचाही लहानेंवर रोषमेळघाटातील पुनर्वसन प्रकरणात जिल्हा पुनर्वसन अधिकारी अजय लहाने यांनी चुकीचा अहवाल देऊन आदिवासी बांधवांवर अन्याय केल्याने त्यांच्यावर आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील केलपाणी, सोमठाणा, बारूखेडा, गुल्लरघाट या आदिवासी क्षेत्रातील आदिवासी बांधवांच्या पुनर्वसनासाठी अमरावती जिल्ह्यात पुनर्वसनासाठी जमीन नाही, असा अहवाल स्थानिक पुनर्वसन अधिकारी अजय लहाने यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांसह शासनाकडे सादर केल्याचा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा आघाडीचे अध्यक्ष लकी जाधव यांनी ३१ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केला.अजय लहाने यांनी चुकीचा प्रस्ताव सादर केल्याने वरील गावातील आदिवासी बांधवांचे अमरावतीऐवजी अकोला जिल्ह्यात पुनर्वसन करण्यात आले. त्यातही मुख्यमंत्र्याच्या उपस्थित पार पडलेल्या व शासननिर्णयानुसार पायाभूत सुविधासुद्धा उपलब्ध करून दिल्या नसल्याचा आरोप आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाºयांचा आहे.