शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

अभियांत्रिकीच्या लेखी परीक्षा २६ फेब्रुवारी ते ४ एप्रिलदरम्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:27 IST

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न २३ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या हिवाळी २०२० परीक्षांचे येत्या २६ फेब्रुुवारी ते ४ एप्रिलदरम्यान ...

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न २३ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या हिवाळी २०२० परीक्षांचे येत्या २६ फेब्रुुवारी ते ४ एप्रिलदरम्यान नियोजन चालविले आहे. या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून, समितीने तसा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाने १ जानेवारी रोजी अध्यादेश जारी केला आहे.

अंतिम सत्र वगळून महाविद्यालय स्तरावर अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा ८ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार आहेत. कोरोना संसर्गामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेशांना विलंब झाला आहे. अशातच हिवाळी

परीक्षादेखील लांबणीवर पडल्याने या महाविद्यालयांपुढे प्रवेश शुल्काबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यापीठाने अभियांत्रिकी परीक्षांना प्राधान्य दिले आहे. त्यानुसार सत्र ५, ७ व ८ परीक्षांचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. एकंदर ३० हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.

केंद्रीय प्रवेश समितीद्धारे होणाऱ्या प्रवेशाच्या अभ्यासक्रमाची आणि थेट द्वितीय वर्षाला प्रवेशित होणाऱ्या अभ्यासक्रमाची, तसेच अभियांत्रिकी व तांत्रिकी पदवी अभ्यासक्रमातील सत्र १ व २ ची परीक्षा १९ एप्रिल २०२१ नंतर विद्यापीठ स्तरावर संचालित करण्यात येणार आहे.

-------------

अभियांत्रिकी, तांत्रिकी अभ्यासक्रम परीक्षेचे नवे वेळापत्रक

प्रात्यक्षिक परीक्षा - ८ ते १२ फेब्रुवारी

लेखी परीक्षा- २६ फेब्रुवारी ते ९ मार्च

विषम सत्र व अंतिम वर्ष, सत्र प्रात्यक्षिक परीक्षा- २२ ते २६ मार्च, लेखी परीक्षा- ५ ते २० एप्रिल

अंतिम वर्ष, अंतिम सत्र वगळून (महाविद्यालय स्तरावर) प्रात्यक्षिक परीक्षा- २२ ते २६ मार्च, लेखी परीक्षा- २७ मार्च ते ४ एप्रिल-

---------------------

कोट

२६ फेब्रुवारी ते ४ एप्रिलदरम्यान अभियांत्रिकी परीक्षा घेण्यात येतील. अध्यादेश जारी करण्यात आला आहे. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ.

--------------