शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

३५ लाखांच्या मका खरेदीवर पशुसंवर्धन समितीत घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 21:58 IST

जिल्हा वार्षिक योजनेतून दृभत्या जनावरांना खाद्य पुरवठ्यासाठी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीने ५० लाखांच्या मागणीपैकी ३५ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषद पशुसंर्वन विभागाने मंजूर केला आहे. यामधून मका व थोंबे खरेदी करून पुरवठा करणे आवश्यक होते.

ठळक मुद्देविषय समितीची सभा : झेडपी सदस्य आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: जिल्हा वार्षिक योजनेतून दृभत्या जनावरांना खाद्य पुरवठ्यासाठी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीने ५० लाखांच्या मागणीपैकी ३५ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषद पशुसंर्वन विभागाने मंजूर केला आहे. यामधून मका व थोंबे खरेदी करून पुरवठा करणे आवश्यक होते. परंतु, पशुसंर्धन समितीच्या मान्यता न दिल्याने ३५ लाख रुपयांचा निधी पडून आहे. त्यामुळे शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समिती सभेत सदस्य शरद मोहोड यांनी आक्रमक होत. सभपाती व प्रशासनाला जाब विचारला.विविध विषयाला अनुसरून पशुसंवर्धन समितीची शुक्रवारी उपाध्यक्ष तथा समिती सभापती दत्ता ढोमणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. सभेच्या प्रारंभी सदस्य शरद मोहोड यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून पशुधन पालक शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर मका व थोंबे (बहुवार्षिक गवत) पुरवठ्यासाठी डीपीसीने ३५ लाख रुपये उपलब्ध करून दिलेत. यामधून ३० लाख रुपयांचा मका व ५ लाख रूपयाच्या निधीतून थोंबे राष्ट्रीय बियाणे महामंडळ (महाबीज) किंवा एनएससी पूणे यांच्याकडून खरेदी करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार ही बाब पशुसंवर्धन विभागाने निदर्शनास आणून दिले. मग महाबीजकडून ही खरेदी का केली नाही, असा प्रश्न माहोड यांनी उपस्थित केला. यावर या बियाण्याचा दर्जा योग्य नसल्याचे मत सभापती ढोमणे यांनी व्यक्त केले. परंतु, याचे काही घेणेदेणे नाही. केवळ शेतकºयांना याचा लाभ व्हावा एवढीच आमची मागणी आहे. शेतकºयांकडून वैरणासाठी मका व थोंबे मागणी असूनही पुरविण्यात आली नसल्याने नाराजी पसरली आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने हा पुरवठा होणे गरजेचे आहे. यावर निर्णय होत नसल्याने जिल्हा परिषद सदस्य चांगलेच संतापले होते.अखेर सभापती दत्ता ढोमणे यांनी मका व थोंबे खरेदीला मंजुरी देण्याचा ठराव मांडला आणि तो सर्वानुमते पारित केला. त्यामुळे या विषयावर पडदा पडला. यावेळी सभेत इतरही विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. सभेला समितीचे सदस्य सुखदेव पवार, दिनेश टेकाम, प्रियंका दाळू, सचिन पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.