शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

२९ जुलै; जागतिक व्याघ्र दिन; जगात सर्वाधिक वाघ भारतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 11:19 IST

Amravati News जगातील एकूण वाघान पैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. भारत जगात सर्वाधिक वाघ असलेला देश ठरला आहे.

ठळक मुद्देमेळघाट व्याघ्र प्रकल्प पहिल्या नऊ पैकी एकइंदिराजींची दूरदृष्टी

अनिल कडू

 लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जगातील एकूण वाघान पैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. भारत जगात सर्वाधिक वाघ असलेला देश ठरला आहे.         सन २००६ मध्ये देशात १४११ वाघ होते. सन २०१० मध्ये १७०० वाघ होते. टायगर एस्टिमेशन रिपोर्टनुसार सन २०१४ मध्ये भारतात २२२६ वाघ होते. त्यात लक्षणीय वाढ झाली असून. सन २०१८ मध्ये ही वाघांची संख्या २९६७ झाली आहे. जागतिक स्तरावर ही नोंद सर्वाधिक ठरली आहे.  

          तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७३ मध्ये सर्वप्रथम देशात व्याघ्र अभयारण्य ही संकल्पना अस्तित्वात आणली. देशात पहिले नऊ व्याघ्र अभयारण्य घोषित केले. यात मेळघाट व्याघ्र अभयारण्याचा समावेश केला गेला. राज्यातील हा पहिला व्याघ्र प्रकल्प.वाघांच्या संरक्षण, संवर्धनात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे योगदान देशपातळीवर उल्लेखनीय असून देशातील टॉप टेन मधील एक व्याघ्र प्रकल्प म्हणून मेळघाटची ओळख आहे. जागतिक व्याघ्र दिनी २९ जुलैला जागतिक स्तरावर देशासह या व्याघ्र प्रकल्पाचा आवर्जून उल्लेख केल्या जातो.

देशातील मोठा व्याघ्र प्रकल्प     वाघांचा सर्वोत्कृष्ट नैसर्गिक अधिवास ठरलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रफळाच्या अनुषंगाने देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे.  मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ २ हजार ७०० चौरस किलोमीटर असून ३६१.२८ चौरस किलोमीटर चे गुगामल राष्ट्रीय उद्यान त्यात समाविष्ट आहे.

 शंभर वाघांची क्षमता         शंभरहून अधिक वाघांचा सांभाळ करण्याची मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची क्षमता आहे. एका वाघाला साधारणतः २५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र लागते. आज मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ५० वाघ आहेत. यात २१ मादी आणि २९ नर आहेत. याव्यतिरिक्त वाघांचे २२ छावे आहेत. वाघांचे छावे विचारात घेतल्यास मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एकूण ७२ वाघ आज वास्तव्यास आहेत.

 क्राईम सायबर सेल        मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत वाइल्ड लाईफ क्राईम सायबर सेल सन २०१३ मध्ये स्थापन केल्या गेला. देशातील हा पहिला सायबर सेल. देशांतर्गत जवळपास अडीचशे शिकाऱ्यांना ,चोरट्यांना या सेलने पकडून दिले आहे. मागणीनुसार त्या त्या राज्याला हा सायबर सेल आपली सेवा देतो. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत चोरट्या शिकाऱ्यांवर या सायबर सेलने आपला वचक निर्माण केला आहे.

टॅग्स :Tigerवाघ