शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिसबाबत वैद्यकीय तज्ज्ञांची कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:12 IST

(फोटो) अमरावती : कोरोनाबाधितांवर शासनाचे मार्गदर्शक सूचनांनुसार ट्रीटमेंट प्रोटोकॉल, शासनाने ठरवून दिलेले दर आकारणे, हॉस्‍पिटल प्रीपेडनेस, म्‍युकरमायकोसिस व इतर ...

(फोटो)

अमरावती : कोरोनाबाधितांवर शासनाचे मार्गदर्शक सूचनांनुसार ट्रीटमेंट प्रोटोकॉल, शासनाने ठरवून दिलेले दर आकारणे, हॉस्‍पिटल प्रीपेडनेस, म्‍युकरमायकोसिस व इतर आनुषंगिक विषयांबाबत वैद्यकीय तज्ज्ञांची जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या उपस्थितीत शनिवारी बचत भवन येथे कार्यशाळा घेण्यात आली.

म्‍युकरमायकोसिस साधारणत: रक्तात साखरेचे प्रमाण नियंत्रणात नाही, अशा कोरोनातून बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्‍ये आढळून येत आहे. प्राथमिक स्‍तरावर उपचार झाल्‍यास या आजाराची जोखीम कमी होऊ शकते. कुठलेही लक्षणे आढळल्‍यास नाक-कान-घसा तज्ज्ञांशी संपर्क साधणे गरजेचे आहे. या आजाराच्या नियंत्रणासाठी त्याचे लवकर निदान आवश्यक असते. त्यात एमआरआय विथ कॉन्ट्रास्टची आवश्यकता असल्याचे नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. क्षितीज पाटील यांनी सांगितले.

औषधे आवश्‍यक असल्‍यासच देण्‍यात यावी. विनाकारण जास्‍तीचे औषध दिल्‍यास त्‍याचा विपरित परिणाम होण्‍याची शक्‍यता असते. शासनाने दिलेल्‍या दिशानिर्देशानुसारच औषधोपचार केला पाहिजे, असे डॉ प्रफुल्ल कडू म्हणाले.

याप्रसंगी ऑक्सिजन ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट, स्‍ट्रक्‍चरल ऑडिट त्‍वरीत करुन घेण्‍याचे सुचित केले. प्रत्‍येक हॉस्‍पीटलने रेट बोर्ड लावावा तसेच हॉस्पिटलची रिपोर्टिंग व सर्व रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना आयुक्त प्रशांत रोडे यांनी केल्या. कार्यशाळेला जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. श्‍यामसुंदर निकम, डॉ. विशाल काळे, डॉ. अजय डफळे, डॉ. विजय बख्‍तार, डॉ. विक्रांत राजुरकर, डॉ. जयश्री नांदुरकर, डॉ. फिरोज खान, नोडल अधिकारी तसेच नाक-कान-घसा तज्ज्ञ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

बॉक्स

म्युकरमायकोसिस रुग्णांना प्राथमिकता द्या

म्युकरमायकोसिस आजाराच्‍या रुग्‍णांना प्राथमिकता देऊन त्‍यांची तपासणी व त्‍वरित औषधोपचार सुरू करावा. प्रत्‍येक रुग्‍णालयाने मागितलेली माहिती त्‍वरित देणे अपेक्षित आहे. बेडची संख्‍या त्‍वरीत उपलब्‍ध करुन देणे गरजेचे आहे. दिलेल्‍या औषधोपचाराची संपुर्ण माहिती तयार करुन ठेवावी. जे आवश्‍यक औषधी आहे त्‍याची नोंद झालीच पाहिजे. अनावश्‍यक औषध रुग्‍णांना देऊ नये, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.