शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत १५ टक्के उपस्थितीत कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने उपस्थितीवर मर्यादा आणली आहे. १५ टक्के कर्मचारी ...

अमरावती : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने उपस्थितीवर मर्यादा आणली आहे. १५ टक्के कर्मचारी शासकीय कार्यालयांत उपस्थित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेत शुक्रवारपासून करण्यात येत आहे. यामुळे आरोग्य विभागातील कर्मचारी वगळता मोजकेच कर्मचारी कार्यालयात राहणार आहेत.

कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने समूह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती १५ टक्के करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुखांनी करावी, शासनाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे पत्र सर्व विभागप्रमुखांना पाठविले. या आदेशामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कमीत कमी पाच कर्मचाऱ्यांवर कामकाजाची जबाबदारी आली आहे. जिल्हा परिषद मुख्यालयात साधारणत: ७०० कर्मचारी आहेत. त्यांच्या १५ टक्के म्हणजे जवळपास १०५ कर्मचारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती मात्र १०० टक्के राहणार आहे.

बॉक्स

अभ्यागतांना कार्यालयात नो एन्ट्री!

जिल्हा परिषदेच्या कार्यालयात आवश्यक असेल तर कार्यालयप्रमुख हे त्यांचे परवानगीने अभ्यागतांना पास देतील. परंतु, याबाबत संबंधित अभ्यागताकडे त्यांचा आरटी-पीसीआर अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. बाहेरील नागरिकांद्वारा प्राप्त टपाल, तक्रारी प्रत्यक्ष कार्यालयात न घेता, संकेत स्थळावर पाठविण्याबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात, असे सीईओंनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.